Mamta Kulkarni topless photoshoot : 90 चा दशकातली बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीची ओळख होती. 1993 मध्ये, ती सैफ अली खानसोबत 'आशिक आवारा' चित्रपटात दिसली, ज्यासाठी तिला न्यू फेस अवॉर्ड मिळाला. १० वर्षाचा कारकिर्दीत ममताने मोजके चित्रपट केले असले तरी, या दरम्यान ती तिच्या चित्रपटांपेक्षा इतर कॉंट्रोव्हर्सीसाठीच जास्त चर्चेत राहिली. मग ते तीच स्टारडस्ट मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी टॉपलेस फोटोशूट असो किंवा मग अंडरवर्ल्डसोबत तिचे संबंध किंवा फिल्म इंडस्ट्री सोडून स्वीकारलेला अध्यात्माचा मार्ग.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1993 मध्ये लोकप्रिय फोटोग्राफर जयेश सेठ यांनी स्टारडस्ट मॅगझिनच्या बोल्ड कव्हर शूटसाठी सुंदर अभिनेत्रीच्या शोधात होते. मात्र, माधुरी दीक्षित आणि जुही चावला या अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर, म्हणून छायाचित्रकार जयेश सेठ यांनी ममता कुलकर्णीशी संपर्क साधला. ममतानं हे शूट करण्यास होकार दिला. या फोटोशूटमध्ये ममता टॉपलेस अवतारात दिसली. या टॉपलेस फोटोशॉटने प्रचंड खळबळ उडाली होती. या बोल्ड फोटोंमुळे त्या काळात प्रचंड वाद निर्माण झाला होता.अनेक संघटनांनी ममता विरोधात प्रदर्शन केले होते. ममतावर अश्लीलता पसरवल्याचे आरोप देखील झाले. मात्र, या वादाने ममता एक रात्रीत स्टार झाली होती. 



सगल्यात महत्तावचंल म्हणजे स्टारडस्ट या मासिकाची नेहमीपेक्षा जास्त किमतीत विक्री झाली, त्यामुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली. फोटोशूटमुळे ममताविरोधात कायदेशीर खटला दाखल झाला आणि पुढे जाऊन तिला 15 हजार रुपये दंड देखील भरावा लागला. मीडियापासून स्वतःला वाचण्यासाठी तिने कोर्टात बुरखाही घातला होता. 


फोटोशूटच्या वादानंतर, ममता कुलकर्णीला प्रसिद्धी आणि टीका या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागला. वादग्रस्त शूटमध्ये सहभागी झाल्याबद्दल तिला धमक्यांचाही सामना करावा लागला. मात्र, काही काळानंतर हा वाद संपला. विवादांना न जुमानता, ममताने लोकप्रियता मिळवली जिचा तिला फायदा झाला आणि तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्यानंतर, ममता कुलकर्णीचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेले, याचदरम्यान ममताची ओळख ड्रगलॉर्ड विकी गोस्वामीसोबत झाली. 


हेही वाचा : लियोनार्डो डिकॅप्रियो ते जॉनी डेप 'हे' हॉलिवूड कलाकार भारतीय गॅन्गस्टरच्या रुपात दिसले असते असे


विकी गोस्वामीनं दुबईत बॉलिवूडचे इव्हेंट्स आयोजित करण्यासोबत आणि ड्रग्जचा स्मगलिंगचा व्यवसाय करत होता. मात्र, 1997 मध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी त्याला 10 वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यात आले होते. यादरम्यान, ममता विकीला नियमितपणे दुबईच्या जेलमध्ये विकीची भेट घ्यायला जात असे. कालांतराने फिल्म इंडस्ट्रीसोडून ममता विकी सोबत दुबईला शिफ्ट झाली. मात्र, अखेरीस तीने अध्यात्माचा मार्ग स्वीकाराला आणि तिने 'ऑटोबायोग्राफी ऑफ योगिनी' नावाचे पुस्तक लिहिले. सध्या ममता अमेरिकेत तिचा बॉयफ्रेंड विकी गोस्वामी सोबत राहत असल्याचे म्हटले जाते.