मुंबई : बॉलिवूडची चमक अशी आहे की, रोज छोट्या शहरांमधून बरेच लोक मायानगरी मुंबईला आपल्याला सिद्ध करण्यासाठी येत असतात. हिंदी सिनेमांनी बर्‍याच लोकांना खूप काही दिलं आहे. पण या सुंदर इंडस्ट्रीच्या वेषात बरेच लोक चुकीच्या गोष्टीही करतात. नुकतीच अशी कामं करणाऱ्या एका व्यक्तीला दादर येथून अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलींची ट्रॅफिकिंग करायचा हा व्यक्ति
ANIने केलेल्या ट्विटनुसार, हा माणूस मुलींची फसवणुक करुन तस्करी करत असे. ही व्यक्ती स्वत:ला सोशल मीडियावर इव्हेंट मॅनेजर म्हणायचा आणि शाहरुख खानच्या चित्रपटात मुलींना काम देण्याची संधी देवू अशी लालच द्यायचा. पश्चिम बंगालहून मुंबईत आणण्यात आलेल्या एका 17 वर्षीय मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे.


मुंबईमधून पोलिसांनी केली अटक
दादर स्थानकातील जीआरपीचे एसआय ज्ञानेश्वर काटकर म्हणाले, 'शाहरुख खानच्या चित्रपटात काम मिळण्याच्या बहाण्याने जीआरपीने पश्चिम बंगालच्या पलाशीपरा येथून मुंबईत आणलेल्या 17 वर्षीय मुलीची सुटका केली आहे. सोशल मीडियावर इव्हेंट मॅनेजर म्हणून ओळख सांगून मुलींना आमिष दाखविणार्‍या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.



शाहरुख लवकरच या चित्रपटात दिसणार आहे
याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात एका मोठ्या आणि प्रसिद्ध स्टारचं नावं घेऊन काळेधंदे केले जायचे. यावेळी शाहरुख खानचं नाव या प्रकरणात वापरण्यात आलं आहे. शाहरुखच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, किंग खान लवकरच पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करणार आहे.