मुंबई : 'कास्टिंग काऊच..' मधून थोडा ब्रेक घेऊन लांब गेलेला निपुण धर्माधिकारी 'बापजन्म' हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बापजन्म' चित्रपटात सचिन खेडेकर प्रमुख भूमिका बजावत आहेत.'बापजन्म' चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलिज करण्यात आलं आहे.  गायिका, अभिनेत्री दीप्ती माटे हीच्या आवजात 'मन शेवंतीचं फूल' हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. या गाण्याला सोशलमीडियात आणि युट्युबवरही रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.आठवड्याभरातच तीस हजाराहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे.  


   'मन शेवंतीचं फूल' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन गंधार संगोराम याने केले आहे. तर क्षितिज पटवर्धन लिखित हे गाणं दीप्ती माटेने गायलं आहे.  


 पहिला आणि खास अनुभव 


 दीप्ती माटे ही गायिका आणि अभिनेत्री मराठी नाट्यभूमीवर संगीत नाटकांमधून आपल्या भेटीला येते. वसंतराव देशपांडे यांची नात आणि आघाडीचा तरूण शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांची बहीण दीप्ती माटे 'बापजन्म' या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण करत आहे. या अनुभवाविषयीचा खास व्हिडिओ देखील फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.