मुंबईः 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमातून आपल्या बोल्ड अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. तिच्या बोल्ड अभिनयाचं त्यावेळी कौतुकही आणि झालं तसंच काही दृश्यांवरून वादही झाले, मात्र, मंदाकिनीचं सौंदर्याची चर्चा मात्र नक्कीच झाली.  सुंदर डोळे, आणि सहजसुंदर अभिनयाने त्याकाळी मंदाकिनीने सर्वांनाच भुरळ घातली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ठराविक सिनेमे केल्यानंतर मंदिकिनीने बॉलिवूडला रामराम ठोकला आणि संसारात रमली मात्र आजही मंदाकिनीच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत.



मंदाकिनी वयाच्या साठीकडे झुकली असली तरी तिचं सौंदर्य कायम आहे. सोशल मीडियावर आजही तिचे चाहते तिचा उल्लेख ब्युटिक्वीन असाच करतात.



मंदाकिनीच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. मंदाकिनी एका म्यूझिक व्हिडीओद्वारे पुन्हा कमबॅक करते आहे.  मुलगा राबिलसह मंदाकिनी पुन्हा स्क्रीनवर झळकणार आहे.



मंदाकिनी जवळपास 26 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे. मात्र वयाच्या 58 व्या वर्षीही मंदाकिनी तितकीत सुंदर दिसते.



जवळपास 26 वर्षांपूर्वी मंदाकिनीला बॉलिवूडला रामराम ठोकावा लागला.. दाऊदसोबत नाव जोडलं जाणं हे सुद्धा त्यामागचं एक कारण सांगितलं जात आहे.