मुंबई : 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' फेम मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची जोडी पाहून प्रत्येकजण असं म्हणायचं की, जेव्हा दोन अपोजिट माणसं एकत्र येतात तेव्हा एक परफेक्ट कपल तयार होतं. दोघं पहिल्यांदा 1996 साली भेटले. राज त्यावेळी मुकुल आनंदचे चीफ असिस्टंट होते आणि एका शोचं ऑडिशन घेण्यामागे ते बिझी होते. त्यावेळी मंदिरा लोकप्रिय शो शांती आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सुपरहिट चित्रपटात काम केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजने त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल एका मुलाखती दरम्यान सांगितलं की, ''मंदिराचं काम मी पाहिलं होतं. आम्ही नितीन मनमोहन यांच्या कार्यालयात भेटलो. मी मुकुल आनंदचा चीफ असिस्टंट होतो आणि ऑडिशन घेत होतो. ऑडिशनसाठी मंदिरालाही बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी मी मंदिराला पहिल्यांदा पाहिलं. तिने लाल आणि पांढरा टी-शर्टसह खाकी पॅन्ट घातली होती. दिलवाले दुल्हनिया या चित्रपटात मी मंदिराला पाहिलं होतं. पण मला ती प्रत्यक्षात जास्त आवडली.  


यानंतर राज आणि मंदिरा एकमेकांचे मित्र झाले. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या आणि याच दरम्यान हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. मंदिरा आणि राज दोघंही एकमेकांच्या अपोजिट आहेत. पण राज म्हणाला की, ''लवकरच आपल्याला कळलं की मंदिरा केवळ त्यांच्यासाठीच बनली आहे. मी मंदिराला सांगितलं की, मला लग्न करायचं आहे. ती शाकाहारी होती आणि मी मांसाहारी होतो. आमच्या सुरुवातीच्या डेट उडुपी हॉटेल्समध्ये झाल्या.''


का आवडला मंदिराला राज?
मंदिराला राजमध्ये काय आवडलं विचारलं असता मंदिरा म्हणाली, 'तो खूप साधा आणि प्रामाणिक आहे. तो बिलकुल फेक नाही. तो जसा आहे तसा समोर आहे. त्याचवेळी राज म्हणाला होता की, मंदिरा ही एक अतिशय हुशार आणि सुंदर मुलगी आहे. त्याचबरोबर आमच्या कठीण काळातही ती नेहमीच साथ देत आली आहे.


मंदिराचे पालक सुरुवातीला सहमत नव्हते
राजच्या मनात सुरुवातीपासूनच मंदिराशी लग्न करावं अशी ईच्छा होती. कोणताही वेळ न घालवता त्याने मंदिराची आपल्या पालकांशी ओळख करून दिली. राजच्या कुटुंबियांना या नात्यात कोणतीही अडचण नव्हती, परंतु मंदिराचे आई-वडील तयार नव्हते. मंदिराच्या आई-वडिलांना भेटण्याविषयी राज म्हणाला होता की, "माझ्या पालकांच्या बाजूने कोणतीही अडचण नव्हती, मात्र अडचण फक्त मंदिराच्या बाजूने होती. कारण ती एका बँकर्सच्या कुटुंबातील होती. तिचे वडील एक संपूर्ण कॉर्पोरेट माणूस होते. मात्र, नंतर ते देखील सहमत झाले कारण त्याच्याकडे देखील पर्याय नव्हता. त्याच वेळी मंदिरा म्हणाली की, माझे पालक रागात होते कारण मी चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी लग्न करण्याचा विचार करत होते आणि हे काम खूप अस्थिर आहे. 


12 वर्षानंतर झाला मुलगा
कुटुंबाच्या संमतीनंतर दोघांनी 1999 साली लग्न केलं. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. लग्नाच्या 12 वर्षानंतर मंदिराने एका मुलाला जन्म दिला.. यानंतर राज आणि मंदिराने 2020मध्ये मुलीला दत्तक घेतलं.मंदिरा आणि राज यांच्या नात्याबद्दल खास गोष्ट म्हणजे हे दोघंही नेहमीच एकमेकांसोबत लॉयल होते. जरी हे दोघे दोन वेगळ्या टोकाची माणसं होती. 30 जूनला हृद्य विकाराच्या झटक्याने राजने अखेरचा श्वास घेतला. राज कदाचित आज निघून गेला असेल, पण तो मंदिराच्या मनामध्ये कायम राहील.