Mouni Roy च्या पतीला Mandira Bedi ने लग्नमंडपातच केलं Kiss, आणि...
सगळेच तिच्या आनंदात सहभागी होत आहेत.
मुंबई : सर्वजण ज्याची वाट पाहत होते, शेवटी तो दिवसही आला. जेव्हा टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयला तिचा जोडीदार मिळाला. मौनी रॉयच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.
शेवटी मौनी रॉय आणि तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियार यांनी सात फेरे घेतले. या आनंदाच्या क्षणी मौनी रॉयची जिवलग मैत्रीण मंदिरा बेदीनेही इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो पोस्ट करून तिला तिच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मंदिराचे हे फोटो सध्या खूपच चर्चेत आहेत. मौनी रॉयच्या पतीला मंदिराने किस केले आहे. लग्नमंडपात विवाहसोहळा पार पडल्यानंतर त्यांनी खास फोटोशूट केले. यावेळी मौनीने एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने मंदिराने ही सूरजला किस केले.हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मौनी रॉयच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर उत्सवाचे वातावरण निर्माण केले आहे. मौनी रॉयचे लग्न काही जवळच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांमध्ये झाले, पण फोटोंच्या माध्यमातून सगळेच तिच्या आनंदात सहभागी होत आहेत.
आतापर्यंत मौनी रॉयच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये सर्वात आनंदी त्यांची प्रिय मैत्रीण मंदिरा बेदी दिसत आहे.
मंदिरा बेदीने इन्स्टाग्रामवर मौनी रॉय आणि सूरज नांबियारसोबतचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत मौनी आणि मंदिरा सूरजला किस करताना दिसत आहेत, तर काही फोटोत मंदिराचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचं दिसत आहे. मंदिराच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की ती खूप दिवसांपासून मौनीच्या लग्नाची वाट पाहत होती.