मुंबई : अभिनय आणि होस्टिंगमध्ये आपला ठसा उमटवणारी मंदिरा बेदी नेहमीच चर्चेत असते. मंदिरा तिचा फिटनेस आणि तिच्या हेअर स्टाईलमुळे देखील ओळखली जाते. खरंतर स्टेलिब्रिटी म्हटलं की, ते आपली स्टाईल आणि आपल्या हेअर कटसोबत वेगवेगळे प्रयोग करुन पाहातात. मग मंदिरा बेदीने इतकी वर्ष एक हेअर कट का ठेवला असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. ज्याचं उत्तर स्वत: मंदिराने दिलं आहे. खरं तर 1994 मध्ये डीडी नॅशनलवरुन मंदिराने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ज्यामध्ये ती 'शांती' च्या भूमिकेत दिसली होती आणि या मालिकेने मंदिराला ओळख मिळवून दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर मंदिरा अनेक सिनेमा आणि डेलीसोप्समध्ये दिसली. ज्यामध्ये मंदिराचे केस कुरळे आणि लांब होते. परंतु अचानक मंदिरेने तिची हेअर स्टाईल बदलली, ज्यानंतर तिने कधीही आपले केस वाढवले नाही.


पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत मंदिराने आपल्या केसांबद्दल सांगितले, मंदिरा म्हणाली की, ती तिच्या लांब केसांमुळे खूश नव्हती आणि तिला समाजात अनेक गोष्टी चुकीच्या असल्याचे सिद्ध करायचे होते.


मंदिरा म्हणाली की, 'मला दररोज माझे कुरळे सरळ करावे लागत होते, म्हणून मग मी एके दिवशी सलूनमध्ये जाऊन माझे केस कापण्याचे ठरवले. त्यावेळेस मला तेथील हेअर स्टायलरने विचारले की, "तुला खात्री आहे का? तुला खरच तुझे केस लहान करायचे आहेत का?"



त्यावर, "मी तिला हो म्हणाली. तरीही, हेअरकटरने माझे केस खांद्यापर्यंत कापले आणि म्हणाली की, 'पुन्हा एकदा विचार कर आणि उद्या पुन्हा ये'."


मंदिरा यावर म्हणाली की, "मी घरी परत आले. परंतु माझा निर्णय झाला होता, म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी सलून उघडण्याआधीच तेथे पोचलो आणि त्या महिलेला माझे केस लहान करायला सांगितले… आणि अशा प्रकारे मी माझे केस कापले. गेल्या 12 वर्षांपासून माझे केस लहान आहेत."


मंदिरा बेदी पुढे म्हणाली, "मी जेव्हापासून केस कापले तेव्हापासून मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळाल्या आहेत. मला किमान 10 पोलिसांच्या भूमिका आणि किमान 5-6 नकारात्मक भूमिकांच्या ऑफर आल्या आहेत. म्हणजेच, आता लोकांनी मला एका सशक्त आधुनिक स्त्रीच्या भूमिकेसाठी निवडले आहे, त्यामुळे माझे लहान केस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत."


"मला लहान केस आवडतात आणि मला पाहिजे तितके लांब ठेवीन. जर माझ्याकडे एखादी तशीच भूमिका आली ज्यासाठी मला माझे केस वाढवावे लागतील, तर मी त्याबद्दल विचार करेन."