मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यात वाद सुरू आहे. त्यावर आता बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोयरालाने वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपले मत मांडले आहे. मनिषाने नेपाळच्या नवीन राजकीय नकाशाचे समर्थन केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. मनीषाचा जन्म नेपाळच्या काठमांडूमध्ये झाला आहे. त्यामुळे भारतात नेपाळचं समर्थन करणं तिला महागात पडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मनीषाने ट्विट करुन नेपाळच्या संसदेत पास केलेल्या नकाशाबद्दल आनंद व्यक्त केला. तिने ट्विट करत लिहलं आहे की, 'क्षेत्रिय सार्वभौमत्व, राजकीय सार्वभौमत्व, आर्थिक सार्वभौमत्व हे सर्व मिळून सार्वभौमत्व राज्य तयार होतं. त्यामुळे यावर विचार करायला हवा.  असं ट्विट तिने केलं आहे.




या ट्विटवर आपण ट्रोल होत असल्याचं लक्षात येताच ती पुन्हा ट्विट करत म्हणाली, 'आपण सर्व जण या परिस्थित एकत्र आहोत. आपली सरकार या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल.' यावेळी आपण सुसंस्कृत होणे आवश्यक असल्याचं देखील ती म्हणाली. 


काय आहे संपूर्ण प्रकरण


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताच्या गृहमंत्रालयाने एक नवीन नकाशा जाहीर केला. ज्यामध्ये कालापानी प्रदेशाचा देखील समावेश होता. नेपाळने भारताच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. कारण नेपाळी कालापानी आणि लिपुलेखवर दावा करत आले आहेत. ८ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कैलास मानसरोवरच्या ८० किमी लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन केले. हा रस्ता लिपुलेक खिंडीत संपतो. नेपाळने यावर नाराजी व्यक्त केली होती.