Animal मधील अभिनेत्यानं वाचवला आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव
Manjot Singh : मनजोत सिंहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Manjot Singh : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर थांबायचं नाव घेत नाही. या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. तर या चित्रपटात रणबीर कपूरच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या सगळ्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. संदीप रेड्डी वांगाच्या 'ॲनिमल' मध्ये दिसत असलेल्या मनजोत सिंह हा सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. तो फक्त रील लाइफ हीरो नाही तर रियल लाइफ हीरो आहे. मनजोतनं एका मुलीचा जीव वाचवला होता.
मनजोत सिंहचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळतंय की एक मुलगी पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना एक व्यक्ती तिथे येते आणि त्या मुलीला वाचवतो. खरंतर तिच्या आजुबाजूला इतकी गर्दी असताना कोणीच तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर एकट्या मनजोतनं ही हिंमत दाखवली. अशात आता त्यानं एक पोस्ट देखील शेअर केलं आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मनोजत हा आता फक्त चित्रपटांमधला नाही तर खऱ्या आयुष्यातील हीरो देखील झाला आहे. खरंतर हा व्हिडीओ 2019 चा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीचा खुलासा स्वत: मनजोतनं केला आहे. मनजोतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करत मनोजतनं कॅप्शन दिलं की 'हा व्हिडीओ 2019 चा आहे. एक मुलगी आत्महत्या करत होती आणि देवाच्या कृपेनं मी तिला वाचवू शकलो. मी योग्यवेळी योग्य ठिकाणी होतो. आपण सगळेच वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतो. कभी कभी आयुष्य जगणं हे सुद्धा एक हिंम्मतीचं काम असतं.'
हेही वाचा : झीनत अमान यांनी दिवंगत फिरोज खान यांच्यावर गंभीर आरोप करताच; मुलगा फरदीन म्हणाला, 'आंटी...'
रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' या चित्रपटात मनजोत सिंहनं त्याच्या भावाची भूमिका साकारली आहे. त्यानं त्यात सहकलाकार म्हणून काम केलं आहे. तर त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर त्याची चांगलीच स्तुती करण्यात येत आहे.