मनमर्जियां कॉन्सर्ट : विक्की कौशल आणि तापसी पन्नूचा धमाकेदार डान्स
संगीतकार अमित त्रिवेदी आणि अनुराग कश्यप यांच्या देव डी सिनेमासाठी अमित त्रिवेदीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
मुंबई : संगीतकार अमित त्रिवेदी आणि अनुराग कश्यप यांच्या देव डी सिनेमासाठी अमित त्रिवेदीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आता पुन्हा एकदा ही जोडी नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचे नाव आहे मनमर्जियां. या सिनेमाची दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.
या सिनेमाची खासियत म्हणजे या सिनेमातून अभिनेता अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. तापसी पन्नू, विक्की कौशल आणि अभिषेक बच्चन यांचा अनोखा लवट्राँगल या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या टीमचा म्युझिकल प्रवास सुरु झाला आहे.
यावेळेस कॉन्सर्टमध्ये तापसी पन्नूने जबरदस्त डान्स केला.
या सिनेमाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे. तर आनंद एल राय ने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
विक्की कौशलच्या राझी आणि संजू सिनेमातील अभिनयाचे भरभरुन कौतुक झाले. तर तापसी पन्नूचा मुल्क सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. यात तिचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला.
यावेळेस अनुराग कश्यप म्हणाला की, अमित त्रिवेदीसोबत काम करणे नेहमीच खूप मजेदार असते. तो मला नीट समजून घेतो आणि त्यावर मनमोकळेपणाने संगीत देतो.
विक्की कौशल आणि तापसी पन्नूची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसत आहे. सिनेमात ते एकमेकांच्या आखंड प्रेमात बुडालेले असतात.
कॉन्सर्टमध्ये विक्की कौशलने खूप धमाल केली.
या सिनेमा १४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.