Manoj Bajpayee On Working With Yash chopra : दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra) यांनी आजवर बॉलिवूडला अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. यश चोप्रा यांचे नाव दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक आहे. यश चोप्रा यांनी आजवर अनेक कलाकारांचे करिअर केले आहे. त्यासोबत बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) देखील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. मनोज वाजपेयीनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. मनोज वाजपेयी देखील यश चोप्रा यांच्यासोबत काम करणाऱ्या काही कलाकारांपैकी एक आहे. मनोज वाजपेयीनं यश चोप्रा यांच्यासोबत 'वीर जारा' (Veer Zaara) या चित्रपटात काम केले होते.  दरम्यान, आता मनोज वाजपेयीनं यश चोप्रा यांच्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज काही दिवसांपूर्वी शर्मिला टागोर यांच्यासोबत डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या गुलमोहर या चित्रपटात दिसला होता. चित्रपटातील त्याच्या भूमिकेनं सगळ्यांनी मने जिंकली होती. मनोज वाजपेयीनं ह्यमून्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत यश चोप्रा यांच्या चित्रपटात काम करण्याविषयी खुलासा केला आहे. याविषयी बोलताना मनोज म्हणाला, यश चोप्रा यांचे चित्रपट पाहुन आम्ही लहाणाचे मोठे झाले त्यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. 'वीर जारा' या चित्रपटात शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रीति जिंटा (Preity Zinta) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर या चित्रपटात मनोजनं प्रीतिच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. पण मनोजची भूमिका ही काही महत्त्वाची नव्हती. त्याची खूप छोटी भूमिका होती. या चित्रपटात जरी मनोज वाजपेयीची भूमिका छोटी असली तरी देखील त्याची भूमिका ही पटकथेसाठी महत्त्वाची होती. 


हेही वाचा : 'तू जबाबदार...', Akanksha Dubey च्या मृत्यूला बॉयफ्रेंड जबाबदार? चाहते असं का म्हणतायत?


मनोज पुढे म्हणाला, 'पिंजरा या चित्रपटात त्याची भूमिका आणि अभिनय हा यश चोप्रा यांच्या पसंतीस उतरला होता. पण त्यांचे स्पष्ट वक्तव्य मला नेहमी आवडायचे. त्यांनी मला सांगितले होते की मी तुझ्यासारख्या अभिनेत्यासाठी चित्रपट बनवत नाही. कारण तू एका वेगळ्या जॉनरचा जबरदस्त कलाकारा आहेस. पण मी आशा करतो की भविष्यात माझ्याकडे काही वेगळ असेल आणि तू त्यात काम करण्यासाठी तयार होशील. ते खूप चांगले होते. ' 


मनोज वाजपेयी शाहरुख खानसोबत काम करण्यावर पुढे म्हणाला, 'त्याच्यासोबत वीरा जारा या चित्रपटात काम करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात मी माझा मित्र शाहरुखसोबत खूप काळानंतर भेटणार होतो. मी आणि शाहरुख दिल्लीत असल्यापासून एकमेकांना ओळखतो. आम्ही रोज भेटत नव्हतो, कारण आम्ही दोघं वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम करायचो.'