Manoj Bajpayee :  बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेते मनोज बाजपेयी हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. मनोज त्यांच्या करिअरसोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिर्फ एक बंदा काफी है हा चित्रपट मनोज बाजपेयी सध्या चर्चेत राहण्याचं कारण आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मनोज सध्या व्यस्त असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांची पत्नी शबाना रझाविषयी एक खुलासा केला आहे. कशा प्रकारे त्यांची पत्नी शबाना रझा यांनी त्यांना खडसावत चांगले चित्रपट कर आणि पैशासाठी कोणतेही चित्रपट करू नको असे सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संपूर्ण प्रकरण मनोज बाजपेयी यांनी सांगितलं आहे. मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटाचं नाव नं घेता सांगितलं की मनोज यांची पत्नी शबाना त्यांचा एक चित्रपट पाहायला गेली होती. त्यावेळी थिएटरमध्ये काही प्रेक्षक चित्रपट पाहून हसत होते. त्यानंतर जेव्हा मनोज यांनी त्यांच्या पत्नीला चित्रपट कसा वाटला विचारले तेव्हा त्यांनी थेट खडसावून असे चित्रपट करू नकोस असे सांगितले. संपूर्ण प्रकरण सांगत मनोज बाजपेयी म्हणाली, “पैशांसाठी चित्रपट करणं बंद कर, आपल्यावर एवढी वेळ अद्याप आलेली नाही. तो चित्रपट फारच वाईट होता, मला लाज वाटत होती, हे फार अपमानजनक होतं. पुन्हा कृपया असा चित्रपट करू नको. पटकथा आणि भूमिका कशी निवडतात तू माहिर आहेस आणि तेच तू करायला हवं. तुला स्वतःला वेगळं सिद्ध करून दाखवायची काही गरज नाही." हे जर ओरडल्या सारखं असेल तरी तिनं दिलेला हा खूप मोलाचा सल्ला होता असं मनोज पुढे म्हणाले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : The Kerala Story चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन अचानक रुग्णालयात दाखल, पाहा नेमकं काय घडलं


ही पहिली वेळ नाही जेव्हा शबानाला असा अनुभव आला होता. तर त्यांना हा अनुभव ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट पाहताना देखील आला होता. या चित्रपटात मनोज बाजपेयी आणि जॉन अब्राहम दोघे दिसले होते. या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन सुरु झाल्यानंतर शबानाला खूप हसू आलं आणि ती तिचं हसू अनावर करू शकत नव्हती त्यामुळे ती तिथून उठून निघून गेली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचा क्लायमॅक्स हा हसण्यासारखा नव्हता. त्याविषयी मनोज यांनी त्यांच्या पत्नीला विचारता त्या म्हणाल्या की, ज्या प्रकारे तू अभिनय केलास ते बघून मला हसायला येत होतं.