मुंबई : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं शनिवारी निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. शनिवारी सकाळी एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शीला दीक्षित यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमारने 'शीला दीक्षित यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दुख: झाल्याचं' म्हटलं आहे. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्मिला मातोंडकरनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 



अभिनेत्री भूमी पेडणेकरने दुख: व्यक्त करत, खरंच एक महान नेता हरपला असल्याचं म्हटलंय. 




शीला दीक्षित १९९८ ते २०१३ पर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाने ३ वेळा दिल्लीत सरकार स्थापन केलं. शीला दीक्षित यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत त्या उत्तर प्रदेशच्या कन्नौज खासदार राहिल्या होत्या. शीला दीक्षित यांना दिल्लीचा चेहरा-मोहरा बदलण्याचं श्रेय दिलं जातं. त्यांच्या कारकिर्दित दिल्लीमध्ये विविध विकास कार्यदेखील करण्यात आली.