मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या रपणधुमाळीत राजकीय नेतेमंडळींची एकमेकांवर चिखलफेक सुरूच आहे. यामध्येच काही मोठ्या नेत्यांचडजून केली जाणारी वक्तव्य वातावरणाला वेगळीच कलाटणीही देत आहेत. काही दिवसांपूर्वाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी एक वक्तव्य केलं. मोदींच्या या वक्तव्यानंतर अनेकांनीच त्यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला. विविध स्तरांतून त्यांच्या या वक्तव्याचा विरोध केला गेला. ज्यामध्ये कलाकारही मागे नाहीत. मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांवर टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राजीव गांधी यांच्याविषयीच्या विधानानंतर तर पूर्णपणे मनातून उतरलात', असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. सर्वसामान्य जनतेला काही कळतच नाही, त्यांच्या काही लक्षातच येत नाही अशा भ्रमात राहू नका असा इशाराही प्रियदर्शनने या ट्विटच्या माध्यमातून दिला. 'ही तिच जनता आहे, ज्यांनी तुमच्या हाती सत्ता देऊन काँग्रेसला घरी बसवलं... (बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही)', असं ट्विटमध्ये लिहित त्याने थेट मोदींना एक इशाराही दिला. 



प्रियदर्शनचं हे ट्विट अवघ्या काही क्षणांमध्ये व्हायरल झालं. परिणामी त्याला मोदी समर्थकांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंतप्रधानांची आई आणि पत्नीविषयी हे असे लोक ज्यावेळी बरळतात तेव्हा तुझी दातखिळसी बसलेली असते का, असा संतापजनक प्रश्न त्याला एका ट्विटर युजरने विचारला आहे. तर कोणी, आमच्या मनातून तर कधीच मोदी उतरणार नाहीत हा विश्वास व्यक्त केला.



 



प्रियदर्शनच्या या एका विधानामुळे तोसुद्धा आपल्या मनातून उतरल्याची प्रतिक्रिया त्याच्या चाहत्या वर्गातील काहींनी केली. त्यामुळे आता मोदी विरुद्ध गांधी कुटुंबाच्या वादात प्रियदर्शनने घेतलेली ही उडी या संपूर्ण प्रकरणाला नेमकी कोणत्या प्रकारे निकाली काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.