सुप्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या सुधाताई करमकर कालवश
मुंबईत राहत्या घरी सुधाताईंनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : बालरंगभूमीसाठी आपलं सारं जीवन वेचणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती सुधाताई करमकर यांचं आज मुबंईत निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. मुंबईत राहत्या घरी सुधाताईंनी अखेरचा श्वास घेतला.
बालरंगभूमीच्या विकासासाठी अपार कष्ट
लिटिल थिएटर या त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून सुधाताईंनी बालरंगभूमीच्या विकासासाठी अपार कष्ट घेतले. साधारण 25 नाटकांची निर्मिती केली.
लहानपणीच रंगभूमीच्या विश्वात वाढलेल्या सुधाताईंचं शिक्षण मुंबईतल्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये झालं. त्यानंतरजेजे स्कूल ऑफ आर्टच्या नाटकांमधून कामं करण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दामू केंकरेंनी त्यांना निवडलं. त्यानंतर सुधा ताईंनी मागे वळून बघितलं नाही.
शिक्षण मुंबईतल्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये
अमेरिकेत जाऊन त्यांनी नाट्यकलेचं उच्च शिक्षण घेतलं,. मुलाचं वेगळं विश्व असतं. त्याची कल्पनासृष्टी वेगळी असते. त्यामुळे प्रौढांसाठी तयार झालेली नाटकं मुलांना रुचणं अवघड आहेत. यावर त्यांचा अढळ विश्वास होता. त्यातूनच त्यांनी लिटील थिएटरची स्थापना झाली.