Kushal Badrike Instagram Post : झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिके हा प्रसिद्धीझोतात आला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सध्या कुशल हा सोनी टिव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या कार्यक्रमात झळकत आहे. आता कुशलच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यात त्याने पत्नी सुनयनाचा उल्लेख केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुशल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. कुशलचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास अजिबात सोपा नव्हता. या संपूर्ण प्रवासात त्याला त्याची बायको सुनयनाची खंबीर साथ मिळाली. आता कुशलने त्याच्या बायकोसाठी इन्स्टाग्रावर खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक फोटोही शेअर केला आहे. 


कुशलच्या पोस्टने वेधलं लक्ष


या फोटोत कुशल हा हातात भरपूर बॅग घेऊन चालताना दिसत आहे. तर त्याची पत्नी ही त्याच्या पुढे चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या हातात एकही बॅग पाहायला मिळत नाही. या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. मागे एका भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या संसाराचा भार हिने एकटीनेच उचललाय म्हणून, असे त्याने म्हटले आहे. 



चाहत्यांच्या कमेंट


कुशलच्या या पोस्टवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कमेंट करत हसण्याचे इमोजी पोस्ट केली आहे. तर त्याच्या अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर एकाने एकाच भांडणात ना दादा नक्की..., असे गंमतीत विचारले आहे. तर एकाने घरातील विषय सार्वजनिक नका करू दादा.. गरम पोळ्या बंद होतील ना तुमच्या, असे म्हटले आहे. तसेच एकाने अरे (रेरेरे) संसार संसार, अशी कमेंट केली आहे. 



दरम्यान कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथक डान्सर आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘मुघल-ए-आझम’ या म्युझिकल शोसाठी अमेरिकेला गेली होती. दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी ‘मुघल-ए-आझम’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकात मराठमोळी अभिनेत्री प्रियंका बर्वे ही अनारकली हे पात्र साकारत आहे. तर सुनयना ही याच नाटकात काम करताना दिसत आहे.