मुंबई : प्रथमेश परब (Prathamesh Parab) ने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.  'आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिल से हम अमीर है अमीर', अशा एकाहून एक पैसा वसूल डायलॉगमुळे प्राजूचा दगडू लोकप्रिय झाला होता. टकाटक आणि टाइमपास मध्ये मुख्य पात्राची भूमिका करण्यापूर्वी त्याने बालक-पालक (Balak Palak) मध्ये एक छोटीशी भूमिका  साकारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता प्रथमेश परब याने आजवर बालक पालक, टाइमपास (Time Pass), टकाटक (Takatak)असे अनेक सिनेमे केले पण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला तो 'टाइमपास' मधला दगडू. नुकताच या चित्रपटाचा तिसरा भाग येऊन गेला, ज्यामध्ये दगडू आणि प्राजक्ता नाही तर पालवीची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. मराठी सिनेमासोबतच प्रथमेशने बॉलिवूडमध्येही अभिनय करुन त्याच्या चाहत्यांची मने जिंकली होती. प्रथमेशने दृश्यम सिनेमातून घराघरांत पोहचला. दृश्यम पाठोपाठ प्रथमेश नुकताच आता दृश्यम 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दृश्यमच्या पहिल्या भागाप्रमाणेच दृश्यम २ हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरत आहे. 


विजय साळगावकर आणि आता त्याच्याशी पंगा घ्यायला आलेल्या तब्बू आणि अक्षय खन्नाच्या यांच्या एंट्रीनं सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली होती. याच दृश्यम 2 मध्ये अभिनेता प्रथमेश परबचीही छोटी भूमिका आहे. बॉलिवूडचा पहिलाच सिनेमा आणि प्रथमेशला त्यात अजय देवगणबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रथमेश परबचा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमात तो बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या अभिनेत्याबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.



 नुकतीच प्रथमेशनं दृश्यम 2 (Drishyam 2) च्या प्रीमियर सोहळ्याला उपस्थिती लावली होती. दृश्यममधील प्रथमेशची एंट्री त्यानं अनेक दिवस लपवून ठेवली होती. पण सिनेमा रिलीज होताच त्यानं त्याच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाची घोषणा केली. याआधी प्रथमेशने दृश्यमच्या पहिल्या भागतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. दृश्यम सिनेमात प्रथमेशची भूमिका छोटीशी असली तरी महत्त्वाची आहे. अभिनेता अजय देवगण बरोबर त्यानं स्क्रिन शेअर केली आहे. दोघांचं एक छोटा सीन त्याच्या चाहत्यांनी शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दगडूला बॉलिवूडच्या पडद्यावर पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.


प्रथमेशनं त्याच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाबद्दल पोस्ट लिहित अजय देवगणबरोबरचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये प्रथमेशने म्हटलं आहे की, 'तुम्ही पाहिला का दृश्यम 2? सिनेमात मी छोटीशी भूमिका साकारली आहे. भूमिका छोटी असली तरी तुमचं मनोरंजन करेल. अजय देवगण सारख्या  लिजेंडसोबत स्क्रीन शेअर करणं हे माझ्यासाठी कायम भाग्यशाली असेल. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये दृश्यम 2 तुम्ही नक्की बघा'. प्रथमेशने ही पोस्ट शेअर करताच त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.