अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : वर्ष दीड वर्षभरापूर्वी आलेला रोल नंबर १८ हा सिनेमा कुणाच्या लक्षातही राहिला की नाही माहिती नाही. पण य़ा सिनेमाची हिरॉईन सारा श्रवण सध्या चर्चेत आहे. कारण तिनं य़ा सिनेमाचा हिरो सुभाष यादव याच्यावर कास्टिंग काऊच आणि विनयभंगाचे आरोप करुन त्याच्याकडून खंडणी उकळली. य़ा प्रकरणी एक पोलीस अधिकाऱ्यासह तिघांना अगोदरच अटक झाली होती. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दुबईला गेलेल्या सारालाही अटक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात साराला हजर करण्यात आल्यानंतर तिला पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला.


आतापर्यंत मी टू प्रकरणानं सिनेमातल्या चंदेरी दुनियेतली काळीबाजू जगासमोर आली होती. पण सारासारख्या अभिनेत्रींनी मी टू सारख्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु आहे.