Shashank Ketkar Childhood Memories : मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. शशांकने नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा चारही माध्यमात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो कायमच त्याच्या आयुष्यातील खासगी गोष्टींबद्दल भाष्य करत असतो. आता शशांकने त्याच्या लहानपणीची एक खास आठवण सांगितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशांक केतकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच शशांकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो त्याच्या लहानपणीचा आवडीचा पदार्थ खाताना दिसत आहे. हा पदार्थ कसा बनवतात याची झलकही त्याने दाखवली आहे. विशेष म्हणजे त्याने यासोबतच एक खास आठवणही सांगितली आहे.  


शशांक केतकरने सांगितली लहानपणीची आठवण


"काल खूप महिन्यांनी पुण्याला घरी गेलो होतो. अगदी लहानपणापासून आवडीचा पदार्थ म्हणजे, सालपापडी. आई कडे किंवा आजी कडे कधी demand केली की त्या नेहमी म्हणायच्या, उन्हाळ्यात करेन. काल तो योग आला! मी, प्रियांका आणि ऋग्वेद येतोय म्हटल्यावर आई नी ३ दिवस आधी तांदूळ भिजवले आणि आमच्यासाठी सालपापड्या केल्या. शिल्पा केतकर, शिरीष केतकर, दीक्षा केतकर, नचिकेत गुतीकर, प्रियांका केतकर, ऋग्वेद आणि मी …सगळ्यांनी मिळून अक्षरशः एका बैठकीत सगळं पीठ संपवल! तुम्हाला आवडते का सालपापडी? तुम्ही काय म्हणता?? सालपापडी की फेण्या? की आणखी काही?", अशी पोस्ट शशांक केतकरने केली आहे. 



शशांकच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. "एका चाहतीने आज पहिल्यांदाच नाव ऐकलं त्याची रेसिपी पाठव ना आम्ही पण करु पाहु...... आईच्या हातचे खाताना चेह-यावरचा आनंद काही औरच", अशी कमेंट केली आहे. तर एकाने "सातारा मध्ये साळपापडी म्हणतात.. पण मला कुरडई, पोहे पापड खूपच आवडतात..त्या बरोबर साबुदाणाच्या चिकवड्या पण", असे म्हटले आहे. 


दरम्यान शशांक केतकर हा चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. सध्या तो ‘मुरांबा’ मालिकेत अक्षय मुकादम हे पात्र साकारत आहे. त्यासोबतच तो लवकरच करण जोहरच्या ‘शो टाइम’ या सीरिजमध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच शशांकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली होती. या सीरिजमध्ये त्याच्याबरोबर मौनी रॉय, श्रिया सरन, इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.