Siddharth Chandekar Fear : मराठी कलाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. गेल्या काही महिन्यांपासून सिद्धार्थ हा सतत त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थची प्रमुख भूमिका असलेला ओले आले हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच  सिद्धार्थ चांदेकर हा 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थने त्याला कायमच एका गोष्टीची भीती वाटते, याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सिद्धार्थ हा विविध फोटो आणि शेअर करत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करताना दिसतो. नुकतंच सिद्धार्थने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.  या फोटोला दिलेल्या कॅप्शनद्वारे त्याने मला कायम या गोष्टीची भीती वाटायची, असा खुलासा केला आहे. 


सिद्धार्थ चांदेकरने केला खुलासा


"माझ्यातील भीतीवर मात करण्यासाठी पहिले पाऊल. नाच ह्या गोष्टीपासून कायम लांब पळत गेलो. कधीच जमणार नाही असं वाटायचं. आता कुठे जरा confidence आलाय. आता पळणार नाही. खूप नाचणार. tips.marathi तुम्ही दिलेल्या संधीबद्दल तुमचे खूप खूप आभार. सई ताम्हणकर तुझेही खूप खूप आभार. त्याबरोबरच रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे तुमचे खास आभार. तुमच्यासोबत मी नाचण्याची स्पर्धा कधीही करु शकत नाही. त्यामुळे तुमचा मान ठेवण्याचा माझा नम्र प्रयत्न. कृतज्ञ", असे सिद्धार्थ चांदेकरने या पोस्टमध्ये सांगितले आहे. 



यावेळी त्याने त्याला नाचण्याची प्रचंड भीती वाटत असल्याचे सांगितले आहे. सध्या तो या भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. सई ताम्हणकरने 'चल लगेच' अशी कमेंट केली आहे. तर सायली संजीवने फायर इमोजी पोस्ट केले आहेत. 


दरम्यान सिद्धार्थ हा काही दिवसांपूर्वी 'ओले आले' या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच तो श्रीदेवी प्रसन्न चित्रपटात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोनेस वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.