मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचे अभिनेते म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखले जाते. आदेश बांदेकरांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. आज आदेश बांदेकर त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. सोहम बांदेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचे वडील आदेश बांदेकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्याने एक छान फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्या दोघांनी छान कुर्ता लेहंगा परिधान केला आहे. 


सोहमने वडिलांना दिल्या खास शुभेच्छा 


या पोस्टला कॅप्शन देताना सोहम बांदेकर म्हणाला, "वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा, आपली जशी शूजची साइज् सेम आहे, तस मला माझ्या मनाची साइज् तुझ्या मनाएवढी मोठी करण्याची इच्छा आहे! आणि जर त्यात थोडी तरही वाढ झाली तरी माझा 2024 सत्कारणी लागला अस वाटेल", असे त्याने म्हटले आहे. 


सोहमच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. यावर अनेकांनी 'वाढदिवसाच्या शुभेच्छा सर' असे म्हटले आहे. तर काहींनी 'वाढदिवसाच्या शुभेच्छा काका' अशी कमेंट केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. 



दरम्यान सोहम बांदेकरने त्याच्या आई-वडिलांप्रमाणे सिनेसृष्टीत पदार्पण केले. सोहमने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. ही त्याची पहिली मालिका होती. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. यात त्याने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. 


यानंतर सोहम हा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात झळकला. या चित्रपटात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांनी पल्लवी काकडे ही भूमिका साकारली आहे. यात सोहम हा पल्लवीचा मुलगा असल्याचे दाखवण्यात आले आहे. यानंतर सध्या सोहम ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहे. ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.