Subodh Bhave Ole Aale Movie :  गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत नवनवीन आणि हटके विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'झिम्मा', 'बाईपण भारी देवा', 'महाराष्ट्र शाहीर', 'सुभेदार', 'वाळवी' या चित्रपटानंतर आता 'ओले आले' हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि मकरंद अनासपुरे यांची मुख्य भूमिका असलेला ‘ओले आले’ हा चित्रपट शुक्रवारी 5 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात वडील-मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच अभिनेता सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. 
आणखी वाचा :  'मला त्याचा कंटाळा...', सिद्धार्थ चांदेकरच्या मैत्रीबद्दल सायली संजीवचं वक्तव्य, म्हणाली '2023 मध्ये...'


अभिनेता सुबोध भावेने 'ओले आले' चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावली. यानंतर त्याने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे. 


सुबोध भावे काय म्हणाला?


"2024 मराठी चित्रपटाची जोरदार सुरवात. ओले आले,  एक धमाल भावनिक अनुभव. अजिबात चुकवू नका. नाना पाटेकर, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, मकरंद अनासपुरे आणि दिग्दर्शक विपुल मेहता तुम्ही सगळ्यांनी फार सुंदर क्षण आम्हाला दिले. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण संघाला मनःपूर्वक शुभेच्छा", असे सुबोध भावेने म्हटले आहे. 


त्यावर सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीवने प्रतिक्रिया दिली आहे. "दादा तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद", असे सिद्धार्थ चांदेकरने म्हटले आहे. तर सायली संजीवने "खूप खूप धन्यवाद" अशी कमेंट यावर केली आहे.



बाप आणि मुलाच्या नात्याची गोष्ट


दरम्यान 'ओले आले' या चित्रपटात बाप आणि मुलाचं असलेले एक गोड आणि हटके नातं उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विपुल मेहता यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘कोकोनट मोशन पिक्चर्स’ यांनी केली आहे. या चित्रपटाला बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांचं संगीत लाभलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सचिन व जिगर यांनी मराठी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं.