Suyash Tilak Special Appreciation Post : झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील सर्वच पात्र ही लोकप्रिय झाली. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे प्रल्हाद कुरतडकर. त्याने या मालिकेत पांडू ही व्यक्तिरेखा साकारली होती. प्रल्हाद हा अभिनेत्यासोबतच एक उत्तम लेखकही आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेचे संवाद लेखन प्रल्हादने केले होते. सध्या प्रल्हाद हा एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सुयश टिळक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सुयशने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने प्रल्हाद कुरतडकरचे कौतुक केले आहे. तसेच त्याचा अभिमान वाटत असल्याचेही सुयश टिळकने म्हटले आहे. त्याने प्रसादचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. 



सुयश टिळकची पोस्ट


"मुंबईत आलो तेव्हा एका प्रोजेक्टवर काम करताना प्रल्हादशी ओळख झाली. मग पुढे का रे दुरावाचे संवाद तोच लिहायचा तेव्हा छान मैत्री झाली. एक छान मित्र, माणूस आणि जोरदार कलाकार म्हणून नेहमीच त्याने मन जिंकलंय आणि गेले काही महिने हा कलाकार फारच उत्तम कथा सांगतोय. कथा कशा सांगितल्या जाव्यात, नुसत्या ऐकताना त्या खऱ्या घडत आहेत, असा भास व्हावा इतक्या ताकदीने त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही हा अनुभव नक्की घ्या. कथा ऐकल्या नसतील तर विझोट कंपनीच्या युट्यूबवर जा आणि ऐका. प्रल्हाद तुझं कौतुक आणि अभिमान वाटतो. खूप प्रेम आणि शुभेच्छा", असे सुयश टिळकने म्हटले आहे. 



प्रल्हाद कुडतरकर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात


दरम्यान प्रल्हाद कुडतरकर हा 'पांडू' या भूमिकेमुळे घराघरात पोहोचला. 'इसरलंय', 'त्या मका काय माहित' या डायलॉगमुळे प्रल्हाद हा घराघरात पोहोचला. त्याचे हे डायलॉगही लोकप्रिय झाले. प्रल्हादच्या पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. त्यानंतर प्रल्हादने ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेचे लेखनही केले होते. प्रल्हाद हा मूळचा लालबाग परळमध्ये राहणारा आहे.


'रात्रीस खेळ चाले' ही मालिका 22 फेब्रुवारी 2016 रोजी प्रसारित झाली. ही मालिका तीन भागांची होती. याचे कथानक एका मालवणी कुटुंब आणि मालमत्तांची वाटणी यावर आधारित होते.