नवी दिल्ली : ज्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरुन दिवसभर रणकंदन सुरू होतं, ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अखेर सुरळीत पार पडले... माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याच हस्ते पुरस्कारांचं वितरण पार पडलं... पुरस्कार घ्यायला जाणार नाही, असं म्हणणाऱ्या सगळ्या कलाकारांनी पुरस्कार स्वीकारले... मराठी कलाकार मंदार देवस्थळी, प्रसाद ओक यांनी हे पुरस्कार स्वीकारणार नाही, असं सांगत सकाळी सरकारवर टीका केली होती... त्याचबरोबर 'म्होरक्या'चे दिग्दर्शक अमर देवकर, बालकलाकार यशराज कऱ्हाडे आणि रमण देवकर यांनीही पुरस्कारसोहळ्यावरुन टीका केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, या सर्वांसह निपुण धर्माधिकारी, अविनाश सोनावणे या सगळ्या कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारले. 


फक्त अकरा पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत होणार होते... आणि इतर पुरस्कार स्मृती इराणींच्या हस्ते होणार होते, याला कलाकारांचा विरोध होता.


गेल्या ६४ वर्षांत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींनीच प्रदान केले. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रपतींव्यतिरिक्त इतर मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.