Aditi Sarangdhar angry post : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून अभिनेत्री अदिती सारंगधरला ओळखले जाते. दामिनी या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अदितीने अनेक मालिकात विविध भूमिका साकारल्या आहेत. वादळवाट या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. ‘नवे लक्ष’ या कार्यक्रमात तिने कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. पण आता अदितसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अदितीने व्हिडीओ शेअर करत तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदिती सारंगधर ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने एका खासगी गाडीतून प्रवास करतेवेळी तिला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. अदिती ही वैयक्तिक कामानिमित्त पुण्यात गेली होती. यावेळी तिचा पुण्यातील एका खासगी वाहनचालकाबरोबर एसीवरुन वाद झाला. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत हा सर्व प्रकार दिसत आहे. 


अदितीने सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार


अदिती ही संबंधित चालकाला “एसी चालू करणार आहेस की नाही? असे विचारते. त्यावर तो चालक "तुम्ही खिडकी बंद करा, मी एसी चालू करतो." यावर अदिती "तुझा एसी 1 वर आहे आणि आम्हाला खूप गरम होतंय", असे रागात त्याला सांगताना दिसत आहे. त्यानंतर ती "एसी फास्ट कर म्हणजेच २ वर चालवं” असे त्याला सांगते. त्यावर तो चालक तिला नकार देतो". यावर ती "गाडी आताच्या आता पोलीस स्टेशनला घेऊन चल", असे त्याला सांगताना दिसत आहे. 


यानंतर अदिती ही “तू मला उलट, उद्दाम बोलत आहेस. एसी चालू कर मला गरम होतंय…तुझा एसी पूर्ण चालतोय का?” असे पुन्हा विचारते. यावर तो चालक "तुम्हाला पोलिस स्टेशनला जायचं ना, चला जाऊ", असे सांगताना दिसत आहे. त्यानंतर अदिती ही 'तुझं नाव काय' असे विचारते. त्यावर तो चालक "माझं नाव काय हे तुम्हाला बुकिंगमध्ये कळेल. ज्याने बुकींग केलीय, त्याला माझं नाव काय ते समजेल", असे सांगताना दिसत आहे. अदितीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ADITI SARANGDHAR OFFICIAL (@adsarangdhar)


खरंच खूप धक्कादायक बाब - अदितीची प्रतिक्रिया


"हे पुण्यातील खासगी कंपनी असलेल्या ओलाचे वाहन चालक आहेत. यांचं नाव अतुल वाघ असं आहे. ओला कॅब ही खरंच खूप धक्कादायक बाब आहे. हे अशाप्रकारचे वर्तन अजिबातच सहन केले जाणार नाही. अतिशय घृणास्पद व लाजिरवाणा प्रकार", असे अदिती सारंगधरने म्हटले आहे. 


दरम्यान, अदितीच्या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. यावर काहींनी यात अदितीची चूक असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी अदितीसोबत घडलेला प्रकार पाहून संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी अभिनेत्री मनवा नाईकसोबतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी तिने पोलिसात रितसर तक्रार केली होती.