मुंबई : उत्तर प्रदेशातील hathras हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची माहिती साऱ्या देशाला मिळाली आणि संतापाची एकट लाट उसळली. अनेक अनुत्तरित प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फोडणाऱ्या या घटनेवर व्यक्त व्हावं तरी कसं हाच प्रश्न अनेकांच्या मनात आला. अमानुष अत्याचारांना सामोऱ्या जाणाऱ्या पीडितेनं या जगाचा निरोप घेतला. पण, तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मिळणारी वागणुक पाहून अनेकांना संताप अनावर झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी पुढाकार घेतला. पण, सुरुवातीला त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर याचदरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले. ज्यामध्ये एका फोटोनं साऱ्या देशाचं लक्ष वेधलं. हा फोटो होता प्रियंका गांधी यांचा. 


पोलिसांकडून होणारा विरोध, समोर असणाऱ्या प्रियंका हे सारं चित्र पाहता, 'आहे का सुरक्षित! कसे वाटतायेत ते हात तिच्यावर?', असा संतप्त सवाल मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिनं उपस्थित केला. प्रियंका यांचा तोच फोटो शेअर करत त्यासोबत महिला सुरक्षिततेबाबत बोलणाऱ्यांना मुळ समस्या नेमकी कुठं आहे हे तिनं दाखवून देण्याचा प्रयत्न केला. 


 


हेमांगीनं एक महिला म्हणून उपस्थित केलेले प्रश्न आणि मांडलेली उदविग्नता या येथे अनेकांचं लक्ष वेधत आहे. महिलांना दर दिवशी अशा कित्येक प्रसंगांचा सामना करावा लागतो. मुळात लहानसहान घटनांचे परिणामच किती गंभीर आणि पुढं जाऊन त्यांचं स्वरुपही किती गंभीर होऊ शकतं हेच तिच्या या पोस्टमधून लक्षात येत आहे.