Mitali Mayekar Ed Sheeran Concert : हॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक एडवर्ड क्रिस्टोफर शीरन (Ed Sheeran) चे लाखो चाहते आहेत. ‘परफेक्ट’, ‘शेप ऑफ यू’ या गाण्यांमुळे तो घराघरात पोहोचला. सध्या तो भारत दौऱ्यावर आहे. शनिवारी 16 मार्चला Ed Sheeran आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांचे भव्य दिव्य कॉन्सर्ट नुकतेच मुंबईत पार पडले. मुंबईतील महालक्ष्मी येथील रेसकॉर्स मैदानात या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टला काही मराठी कलाकारांनाही हजेरी लावली. नुकतंच अभिनेत्री मिताली मयेकरने या कॉन्सर्टचा अनुभव सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिताली मयेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर करत Ed Sheeran च्या कॉन्सर्टची झलक दाखवली आहे. यात Ed Sheeran हा हातात गिटार घेऊन गाणं गाताना दिसत आहे. त्यावेळी मिताली मयेकर ही त्याला हात दाखवते आणि तो देखील मंचावरुन तिला थम्ब दाखवत प्रतिसाद देतो, असे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 


कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल


मितालीने हा व्हिडीओ शेअर करताना त्याला हटके कॅप्शन दिले आहे. “आम्ही 8 तास उभे राहिलो आणि ते खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं....आणि यानंतर आमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.” असे मितालीने यात म्हटले आहे. Ed Sheeran च्या या कॉन्सर्टसाठी मितालीसोबतच तिचा पती अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर हे कलाकारही हजर होते. सध्या मितालीने शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होतानाही दिसत आहे. 



Ed Sheeran भारतातील दौरा करुन लंडनला परतला


दरम्यान Ed Sheeran मुंबईत आल्यापासून त्याची सातत्याने चर्चा पाहायला मिळत होती. Ed Sheeran ने दिलजीत दोसांझसह मुंबईत एक लाईव्ह कॉन्सर्ट केले. यावेळी लाइव्ह परफॉर्म करताना त्याने काही पंजाबी गाणीही म्हटली. तसेच त्याच्यासाठी अनेक पार्ट्यांचेही आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधील काही कलाकरांनाही त्याची भेट घेतली. 


त्यानंतर Ed Sheeran शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यावर भेट दिली. यावेळी त्याने गिटार वाजवत त्याचं लोकप्रिय गाणं ‘परफेक्ट’ गायले. त्यावेळी शाहरुख खान हा Ed Sheeran च्या बाजूला बसून आवाजात दंग झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान Ed Sheeran भारतातील दौरा पूर्ण करुन 17 मार्चला लंडनला परतला आहे. त्याने पुन्हा एकदा भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.