Namrata Sambherao Prasad Khandekar Birthday Post :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसाद खांडेकर खूप लोकप्रिय आहे. त्याने आतापर्यंत अनेक नाटक, स्किटचे दिग्दर्शन आणि लेख केले आहे. प्रसाद खांडेकर आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आता अभिनेत्री नम्रता संभेरावने एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री नम्रता संभेराव ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात नम्रताने प्रसाद खांडेकरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यातील एक फोटो 2013 मधील आहे. तर दुसरा फोटो हा 2024 मधील आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने त्यांच्या मैत्रीला 10 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितलं आहे.  


नम्रता संभेरावची पोस्ट


"आपल्या मैत्रीला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा आणि वाढदिवसाच्याही शुभेच्छा. तू खूपच कतृत्ववान आहेस. मल्टीटास्क करणारा माणूस. तसेच एक सर्वोत्तम मुलगा, सर्वोत्कृष्ट मित्र, सकारात्मकता आणि इतर सर्व गोष्टींचा ओव्हरलोड असलेला. खूप प्रेम पश्या. खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ. तुझ्या उत्तमोत्तम प्रोजेक्ट्सची लाईन लागू दे, सिनेमे नाटक सगळंच खूप गाजू दे, त्या सगळ्यात मी नेहमीच असेन बाय डिफॉल्ट. कारण माझ्या आयुष्यातल्या पहिल्या बक्षिसाची सुरुवात तू लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या कुर्रर्रर्र ह्या नाटकापासून झाली आणि आत्मविश्वास द्विगुणित झाला. यासाठी खूप खूप धन्यवाद आण काळजी घे. आज हास्यदिन आहे किती सुंदर योगायोग", असे नम्रता संभेरावने म्हटले आहे. 



"वाढदिवसाच्या शुभेच्छा पश्या. नेहमी असाच आनंद पसरवत राहा. चल एक पोस्ट एक रिल एक स्टोरी बस झालं आता गिफ्ट मागू नको please", असेही नम्रताने तिच्या आणखी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. 


दरम्यान नम्रता संभेरावची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक कलाकार तसेच चाहते लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव करताना दिसत आहेत. यावर अनेकांनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशा कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सध्या नम्रता ही 'नाच गं घुमा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात तिने मोलकरणीचे पात्र साकारले आहे. तिच्या पात्राचे सध्या सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहे.