Pooja Birari Bullock Cart Race: छोट्या पडद्यावर आपल्याला वेगवेगळ्या मालिका पाहायला मिळतात. प्रत्येकवेळी आपल्याला कोणत्या वेगळ्या विषयावर मालिका पाहयला मिळते. अशात आता आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच नाव 'येड लागलं प्रेमाचं' असून या मालिकेत दिसणार अभिनेत्री पूजा बिरारी ही या निमित्तानं आपल्याला बैलगाडा शर्यतीत भाग घेतल्याचे पाहायला मिळणार आहे. पूजाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजानं या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून हा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या मालिकेच्या प्रोमोमध्ये पूजा ही बैलगाडा शर्यतीत भाग घेतल्याचे दाखवण्यात आले आहे. आता ती ही स्पर्धा जिंकते की नाही हे तर मालिकेतून कळेल पण सध्या हा सीन चांगलाच व्हायरल होतोय. त्यानिमित्तानं पूजा बिबारीनं याला शूट करण्याचा संपूर्ण अनूभव सांगितला आहे.  त्याविषयी पुजा बिबारी, "बैलगाडा शर्यत शूट करायची असं ठरल्यापासून मनात खूप उत्सुकता होती. मी कधीच बैलगाडी चालवली नाहीय. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची खुपच उत्सुकता होती. पंढरपुरात आम्ही ही बैलगाडा शर्यत शूट केली. जवळपास 4 ते 6 दिवस या भागाचं शूट सुरु होतं. सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत आम्ही याच सीनवर मेहनत घेत होतो. मात्र, टीममधल्या कुणाच्याही चेहऱ्यावर थकल्याचे भाव नव्हते. सीन अधिकाधिक चांगला कसा होईल याकडेच सर्वांचं लक्ष होतं. बैलगाडी चालवणं हे मोठं आव्हान तर होतंच पण त्यासोबतच बैलांसोबत जुळवून घेणं म्हणजे तारेवरची कसरत होती. बैलगाडी नुसती चालवायची नव्हती तर ती शर्यतीत पळवायची होती. त्यामुळे खूप काळजी घेऊन शूट करावं लागत होतं."


हेही वाचा : Live कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Video


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे पुजानं सांगितलं की "आमच्या टीमने सर्वांचीच उत्तम सोय केली होती. दिग्दर्शकासोबतच बैलांच्या खऱ्या मालकांनी देखिल मला बैलगाडी चालवण्याचे धडे दिले. मी हा सीन बॉडी डबलची मदत न घेता केला. शूटिंगच्या दिवशी सगळे गावकरी हा सीन पाहाण्यासाठी जमले होते. खरतर खूप वेळा रिटेक्स झाले. मात्र, आम्ही सर्वांनी हा सीन हताश न होता पूर्ण केला. मालिकेतला राया म्हणजेच अभिनेता विशाल निकमनं या सीनसाठी मला खूप मदत केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बैलांसोबत मी हा सीन शूट केला त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांची मी नेहमी ऋणी असेन. माझ्यासाठी हा अतिशय विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव होता. हा अनुभव माझ्या आठवणींच्या शिदोरीत कायम असेल. हा सीन स्क्रीनवर कसा दिसणार हे पहाण्यासाठी मी उत्सुक आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका येड लागलं प्रेमाचं 17 मे पासून रात्री 10.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर"