Pooja Sawant Siddhesh Chavan Marriage : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयाबरोबरचं नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा सावंतने एका मुलाखतीत ती कुठे लग्न करणार? कुठे करणार याबद्दल भाष्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा सावंतने नुकतंच 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझ्या लग्नाचे प्लॅनिंग काय? तू कधी लग्न करणार आहेस? तू डेस्टिनेशन वेडींग करणार की साध्या पद्धतीने लग्न करणार असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने तिच्या लग्नाचे संपूर्ण प्लॅनिंग उघड केले. यावर बोलताना पूजा सावंत म्हणाली, तुम्ही हा प्रश्न सिद्धेशलाही विचारला पाहिजे. कारण मी त्याच्या सुट्ट्यांसाठी थांबली आहे. आम्हाला 2024 मध्येच लग्न करायचं आहे. 


यावर्षात लग्नाचा प्लॅन करणार


सिद्धेश येत्या फेब्रुवारी, मार्चमध्ये भारतात येणार आहे. जर त्याला सुट्टी मिळाली, तर आम्ही चट मंगनी पट ब्याह अशा पद्धतीने लग्न करु शकतो. कारण 2025 या पूर्ण वर्षात मला अजिबात वेळ नाही. हल्ली डेस्टिनेशन वेडिंगचं प्रचंड फॅड आलं आहे. पण काही लोकं ते फक्त दिखाव्यासाठी करतात, असं मला वाटतं. मला लग्न आणि विधींचा जो गोडवा असतो, तो जपायचा आहे. सिद्धेश खूप साधा आहे. त्याला साध्या गोष्टी आवडतात. त्यामुळे आम्ही जे काही ठरवू ते आयुष्यातलं असं खूप मोठं वगैरे असं काही नसेल. आम्ही खूप साध्या पद्धतीने आणि कुटुंबाच्या उपस्थित लग्न करु. पण यावर्षात लग्नाचा प्लॅन करणार आहोत, असे पूजा सावंत म्हणाली. 


"कोकण की मुंबई, कुठे लग्न करणार?"


"यानंतर पूजाला तू कोकणात लग्न करणार की मुंबईत असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने मुंबई असे म्हटले. मला डेस्टिनेशन वेडिंग करायचं नाही. डेस्टिनेशन वेडिंग सुंदर आहे. कुठेतरी दूर एखादं ठिकाण असतं. तिथे सर्व माणसं पोहोचतात. पण मी शूटमध्येच इतका प्रवास करते. त्यामुळे मला माझ्या लग्नाच्या दिवशी प्रवास करायचा नाही. सुटकेस घेतली ना? हे राहिलं, ते राहिलं, चला, चला वेळेवरती असं मला अजिबात करायचं नाही.


मला माझ्या घरात सकाळी छान उठायचं आहे. माझ्या आईच्या हातचा नाष्टा करायचा आहे आणि मग तयार होऊन लग्नाला जायचं आहे. माझ्या लग्नाचं ठिकाणी जिथे असेल तिथे माझ्या सर्व माणसांनी छान पोहोचावं. त्यांचा जो काही प्रवास असेल तो सुखकर असावा. उगाच कुठे लग्न करतेय ही आता? हे मला नकोय. मला लग्नात हेही नकोय की, याची गाडी मिस झाली. कसा पोहोचणार हा? असं काही नको. त्यामुळे मला डेस्टिनेशन करायचं नाही. मी माझ्या मुंबईत लग्न करणार", असे पूजा सावंतने सांगितले. 



दरम्यान पूजा सावंतने काही दिवसांपूर्वी एका मुलासोबतचा फोटो पोस्ट केला होता. तिच्या या फोटोमध्ये तिने We are engaged असे म्हटले होते. यानंतर पूजाने तिच्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण असल्याचे सांगितले होते. तो ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. पूजाचं हे लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे.