मुंबई : Actress Prajakta Mali Photoshoot : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय आहे.  प्राजक्ताने साडीत हटके फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मात्र, ती या फोटोवरुन ट्रोल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सौंदर्यासह सहज सुंदर अभिनयानं तिने इंडस्ट्री गाजवली आहे. आजपर्यंत तिने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरले आहे. तिला अलिकडेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते तिला ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 


प्राजक्ताने अभिनय कौशल्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. प्राजक्ताने साडीत हटके फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिने सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. प्राजक्ताच्या सौंदर्याने नेहमीच चाहते घायाळ होत असतात. मात्र, नो ब्लाऊज साडी लूकमुळे प्राजक्ता माळी ट्रोल झाली आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. 



या नवीन लूकमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. साडीत तिचा हटके लूक दिसत आहे. फोटोशूटसाठी प्राजक्ताने नो ब्लाऊज साडी लूक केला आहे. प्राजक्ताचा चाहता वर्गही मोठा आहे. सोशल मीडियावरुन प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. परंतु तिच्या या नवा लूक चाहत्यांना पसंत पडलेला दिसून येत नाही. काहींनी ‘साडी नेसताना ब्लाऊज परिधान न करणं ही कसली फॅशन?’ अशा कमेंट्स करत प्राजक्ताला ट्रोल केले आहे. प्राजक्ताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काहींना प्राजक्ताचा हा ग्लॅमरस लूक आवडला आहे.