मुंबई : रेशम टिपणीस गेल्या कित्येक दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे. 1992 मध्ये शाहरूख खानच्या बाजिगर या सिनेमांत अंजली सिन्हाची भूमिका साकारताना रेशम दिसली. त्याचप्रमाणे हिंदीच्या छोट्या पडद्यावर देखील रेशमने भरपूर काम केलं आहे. रेशमने वयाच्या 20 व्या वर्षी संजीव सेठ या अभिनेत्यासोबत 1993 मध्ये लग्न केलं. मात्र काही कारणामुळे तिने 2000 मध्ये घटस्फोट घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रेशमचा कोण आहे बॉयफ्रेंड?



आपल्याला माहित आहे रेशम सिंगल पॅरेंट आहे. रेशमला रिशिका आणि मानव अशी 2 मुलं आहेत. रेशम घटस्फोटित असून ती या दोन्ही मुलांना एकटी सांभाळत आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार रेशम टिपणीसचा एक बॉयफ्रेंड आहे. संदेश किर्तीकर असं या तरूणाचं नावं आहे. संदेशसोबत रेशम अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सांगितलं आहे. तिच्या या रिलेशनशिपबद्दल रिशिकाला देखील माहित आहे. रेशम बॉयफ्रेंड संदेशला 'मब्स' या नावाने हाक मारते. तसेच संदेश रेशमपेक्षा 5 वर्षांनी लहान असल्याचं देखील समजतंय. रेशम 42 वर्षांची असून संदेश 38 वर्षाचा आहे. 


संदेश रेशमच्या फेसबुकवर अनेक फोटोंवर कमेंट करताना दिसतो. संदेश आणि रेशम गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि गेली अडीज वर्षे ते डेट करत आहेत. रेशम आणि त्याच्या नात्याला अनेक वर्ष झाली असूनही त्यांनी अद्याप लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही.