Ruchira Jadhav New Car : सध्या मराठी कलाकारांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक कलाकार हे वैयक्तिक आयुष्यात भरारी घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. तर काहींनी नवीन कार घेतली आहे. आता या यादीत एका प्रसिद्ध अभिनेत्रीचाही समावेश झाला आहे. मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत अभिनेत्री रुचिरा जाधवने काही दिवसांपूर्वी नवीन घर खरेदी केले आहे. त्यानंतर आता रुचिरा जाधवने नवीन कार खरेदी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अनेक कलाकारांनी नवीन घरं, नवीन कारची खरेदी केली. तर काहींनी नव्या चित्रपटाची मालिकेची घोषणा केली आहे. आता स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतील अभिनेत्री रुचिरा जाधवनेही अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर नवीन गाडी खरेदी केली आहे. तिने तिच्या आई-वडिलांना ही अलिशान नवी कोरी गाडी भेट म्हणून दिली आहे.  


रुचिरा जाधवची पोस्ट


रुचिरा जाधव ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात रुचिराने नव्या गाडीचे फोटो शेअर करत झलक दाखवली आहे. यावेळी रुचिरा आणि तिचे आई-वडिल दिसत आहेत. रुचिराने या फोटोला हटके कॅप्शनही दिले आहे. “अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा. माझ्या सुवर्थरथाचं (रुचिरा जाधव) विश्वात स्वागत करत आहे. या सुवर्ण दिवशी आई-वडिलांसाठी खास सरप्राइज.” असे कॅप्शन रुचिराने या पोस्टला दिले आहे.



रुचिरा जाधवच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. या कमेंटमध्ये त्यांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. यावर अनेकांनी तिला 'अभिनंदन', 'आम्हाला तुझा खूप खूप अभिमान वाटतो', 'तू तुझे आणखी एक स्वप्न पूर्ण केलंस' अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.


दरम्यान रुचिरा जाधवने गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन घर खरेदी केले होते. रुचिराने या पोस्टला कॅप्शन देताना स्वप्नपूर्ती झाल्याचे म्हटले होते. आता सध्या रुचिरा ही सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत झळकत आहे. यापूर्वी ती तिने 'बिग बॉस मराठी ४'मध्येही सहभागी झाली होती. रुचिरा जाधवने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.