मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा १५ वर्ष जूना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत अभिनेत्री 'भरत नाट्यम'च्या वेशात दिसत आहेत. सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्हाला ओळखूही शकणार नाही. हे फोटो स्वत: अभिनेत्रीने शेअर केले आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री संस्कृती बालगूडे आहे. जिने आपल्या अभिनयाने आणि तिच्या डान्सने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही झी मराठीच्या पिंजरा या मालिकेतून घराघरांत पोहचली. यानंतर अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये तर कधी ती आयटम साँगमध्ये दिसली. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा चौक हा सिनेमा रिलीज झाला होता. मात्र सध्या अभिनेत्री सिने सृष्टीत फारशी सक्रिय नाही. अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.



फोटो शेअर करत संस्कृतीने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''15 वर्षे! 'अरंगेत्रम'ला आज 15 वर्षे पुर्ण  आज, २५ ऑगस्ट मार्क, माझ्या आयुष्यातील एक अतुलनीय, आयुष्य बदलणारं वर्ष आणि क्षण होता. खरंतर मी ईच्छिते की मी हे पुन्हा सगळं करु शकेन, मात्र याविषयी विचार करणं सुद्धा मला भिती वाटते. यावर अजूनही विश्वास बतत नाही या गोष्टीला १० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेलाय.  तरीही त्या आठवणी माझ्या हृदयात आणि आत्म्यात ताज्या आहेत..  तेव्हा असलेल्या माझ्या भोळ्या भाबड्या स्वभावासाठी आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी  ज्यामुळे आज मी या सगळ्या परिस्थितीतून जाऊ शकले. कोणत्याही गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कधीच उशिर होत नाही. बरोबर ना! यासाठी तुम्हा सर्वांना धन्यवाद!''


सोशल मीडियावर अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंट करत लिहीलंय, खूप क्यूट संस्कृती. तर अजून एकाने लिहीलंय, खूप छान. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स चाहते तिच्या या फोटोवर शेअर करत आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोवर हार्ट आणि फायर ईमोजी शेअर केले आहेत.