Shahid Kapoor Hindi Movie : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन हे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. आता या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री झळकल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वत: पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद कपूरचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट शुक्रवारी 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 2 वर्षांनी शाहिद कपूरने मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केले. या चित्रपटाने एका दिवसात 14 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाबद्दल एका मराठमोळ्या अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. 


पोस्ट करत दिली गुडन्यूज


छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून स्नेहल शिदमला ओळखले जाते. स्नेहल शिदमने नुकतंच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती शाहिद कपूरसोबत झळकत आहेत. तिने याबरोबर चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.


"कळवायला उशीर आणि आनंद दोन्ही होतोय, शाहीद कपूर आणि क्रिती सॅनन यांचा नवीन हिंदी सिनेमा "तेरी बातो में ऐसा उलझा जिया" नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात माझी एक शोटीशी भुमिका आहे. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा सिनेमा आणि कसा वाटतोय ते सांगा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असच राहु द्या", असे कॅप्शन स्नेहलने या फोटोला दिले आहे. 



स्नेहल शिदमचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. यात ती कोणती भूमिका साकारत आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण तिच्या या पोस्टनंतर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री वनिता खरातने छोटी अशी कमेंट यावर केली आहे. तर अभिनेता निखिल बनेने अभिनंदन असे म्हटले आहे. 


दरम्यान 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिद कपूर, क्रिती सेनॉन, धर्मेंद्र, डिंपल कपाडिया, राकेश बेदी हे कलाकार झळकत आहेत. यात शाहिद हा  AI रोबॉट असलेल्या क्रितीच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर मग पुढे काय घडते असे कथानक यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना शाह यांनी केले आहे.