Sonalee Kulkarni आता थेट साऊथमध्ये झळकणार, चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर
Sonalee Kulkarni South Indian Movie : सोनाली कुलकर्णीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू केल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाची जादू करणार आहे.
Sonalee Kulkarni South Indian Movie : मराठी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही लवकरच 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Tararani) या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सोनाली सध्या तिच्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनालीनं नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीनंतर सोनाली आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये दिसणार आहे. सोनालीनं तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलं आहे. हे पोस्टर पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. इतकंच काय तर सर्वत्र आता तिच्या या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
सोनालीनं तिच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'मलाईकोट्टई वालिबन' (Malaikottai Vaaliban) असं आहे. सोनाली मल्याळम चित्रपटात दिसणार आहे. या पोस्टरमध्ये सोनाली डोंगर-दऱ्या, नदी, झाडं-झुडूप दिसत आहेत. तर या पोस्टरमध्ये तीन पावलं देखील दिसत आहेत. या पाऊलांनी सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
सोनालीनं हे पोस्ट शेअर करत 'मलाईकोट्टई वालिबन' चं पोस्टर तुमच्या भेटीला. हॅपी इस्टर. आजच्या दिवशी तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर. येत्या 14 एप्रिल रोजी या चित्रपटाबाबत एक महत्वाची घोषणा होणार आहे', असं कॅप्शन दिलं आहे. सोनालीच्या या पोस्टमुळे आता तिचे चाहते आशा करत आहेत की 14 एप्रिल रोजी चित्रपटाचा टीझर भेटायला येऊ शकतो किंवा मग चित्रपट प्रदर्शनाच्या तारिखेची घोषणा करण्यात येईल. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, सोनालीचा हा चित्रपट डिसेंबर 2023 ला भेटायला येऊ शकतो.
सोनालीचा हा चित्रपट कशावर आधारीत आहे. इतिहासावर आधारीत आहे का? असा प्रश्न देखील अनेकांना आहे. चित्रपटाची पटकथा जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं सोनालीला दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर काम करणार आहे. मराठी चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटात काम करणार हे जाणून तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : 'हम झुकने वालों में से नहीं...', अनुष्का शर्माचं करिअर संपवण्याच्या वादावर Karan Johar नं दिला इशारा
एक नेटकरी सोनालीच्या या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, मल्याळम चित्रपट आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, नक्की हे कसलं आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, मराठीमध्ये हा चित्रपट येणार आहे का?