सोनाली कुलकर्णीने लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी केला हा खास पदार्थ
सोनालीने (sonali kulkarni) सासरचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
मुंबई : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची सध्या तिच्या हॉट फोटोमुळे सोशल मीडियावर हवा आहे. सोनालीने कोरोनात लग्न केलं. निर्बंध असल्याने सोनालीला शाही विवाह करता आला नाही. मात्र तिने अखेर लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा कुणाल बनोडेकोसोबत सप्तपदी घेतल्या. सोनालीने सासरचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. (marathi actress sonali kulkarni made sweet dish for her husband kunal benodekar and his family shares photos on instagram)
सोनालीने सासरी पहिल्यांदाच गोड पदार्थ केला आहे. सोनालीने या इंस्टाग्राम पोस्टसह एक उखाणाही शेअर केला आहे. सोनालीने सासरच्या लोकांसाठी तांदळाची खीर केली आहे. सोनाली शेअर केलेल्या फोटोमध्ये पारंपरिक लूकमध्ये दिसतेय.
सोनालीने गेल्यावर्षी 7 मे ला कुणाल बनोडेकोसोबत दुबईत सप्तपदी घेतल्या होत्या. सोनालीने कोरोना काळात लग्न केल्याचं ठरवलं. त्यानुसार तिने खबरदारीही घेतली होती. सोनालीच्या लग्नाला अवघ्या मोजकेच जण उपस्थित होते.
सोनालीने आपल्या 33 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने लग्नाची माहिती जाहीर करत सगळ्यांना सुखद धक्का दिला होता. 7 मे रोजी सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करत नव्या आयुष्याची सुरूवात केली होती.