Suruchi Adarkar Piyush Ranade Post : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सुरुची अडारकरला ओळखले जाते. का रे दुरावा या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. सुरुचीने मराठी अभिनेता पियुष रानडे या दोघांचा विवाहसोहळा गेल्यावर्षी ६ डिसेंबर २०२३ रोजी थाटामाटात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील त्यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित राहिले होते. काही दिवसांपूर्वी सुरुचीने तिला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा केला. आता पियुषने सुरुचीला एक भेटही दिली आहे. 


पियुषला मिळाला खास पुरस्कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पियुष रानडेला बिग मराठी इंटरटेनमेंट अॅवॉर्ड सोहळ्यात एका पुरस्काराने गौरवण्यात आले. आता सुरुचीने याबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने त्याचे काही फोटो सुरुचीने शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने पियुषचे कौतुक केले आहे. तसेच माझा वाढदिवस खास केल्याबद्दल धन्यवाद असेही तिने म्हटले आहे. 


सुरुची अडारकरने केले कौतुक


किती सुंदर दिवस. माझ्या प्रेमाचे खूप खूप अभिनंदन. मला तुझा नेहमीच अभिमान वाटतो. तुझी मेहनत, सातत्य, प्रामाणिकपणा आणि तुझ्या कामाबद्दलची तुझी आवड. तू आतापर्यंत जे काही स्वप्न पाहिलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तू पात्र आहेस. मला वाढदिवसाची सर्वोत्तम भेट दिल्याबद्दल तुझे आभार. खूप खूप प्रेम. ही फक्त सुरुवात आहे, अजून बरेच काही बाकी आहे. बिग एफएमचे विशेष आभार. त्यासोबतच माझा वाढदिवस खास बनवल्याबद्दल धन्यवाद, असे सुरुची अडारकरने म्हटले आहे. 


पियुषची प्रतिक्रिया


सुरुची अडारकरच्या या पोस्टवर पियुषनेही कमेंट केली आहे. पियुषने "मी तुझ्याशिवाय काहीच नाही", अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेक चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. यावर एकाने अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तर एकाने सुरुचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


दरम्यान सुरुची अडारकर ही ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुरुचीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच सुरुची ही सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत झळकली होती. याशिवाय पियुष रानडे सध्या कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.