`लग्नानंतर काय बदल झाला?` सुरुची अडारकरने सांगितला अनुभव, म्हणाली `पियुष मला घरकाम...`
सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली. ते दोघेही 6 डिसेंबर 2023 रोजी विवाहबंधनात अडकले. सुरुचीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबद्दलची जाहीर माहिती दिली होती.
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुरुची अडारकरला ओळखले जाते. ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे सुरुची अडारकर घराघरात पोहोचली. या मालिकेनंतर आता तब्बल 8 वर्षांनी तिने 'झी मराठी' वाहिनीवर पुनरागमन केले. सध्या ती 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत झळकत आहे. नुकतंच सुरुचीने लग्नानंतर काम करण्याचा अनुभव कसा आहे, याबद्दल सांगितले आहे.
सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली. ते दोघेही 6 डिसेंबर 2023 रोजी विवाहबंधनात अडकले. सुरुचीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबद्दलची जाहीर माहिती दिली होती. सुरुची आणि पियुष यांच्या लग्नानंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता सुरुचीने 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेद्वारे पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या निमित्ताने नुकतंच तिने 'टाईम्स ऑफ इंडिया' या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लग्नानंतर काम करताना अनुभव कसा आहे, याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने तिचा पती अभिनेता पियुष रानडेची मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया काय होती, याचाही खुलासा केला.
नवीन भूमिकेबद्दल पियुषची प्रतिक्रिया
"पियुषला माझ्या नव्या मालिकेचा खूप आवडला. मी आणि पियुष दोघेही आमच्या प्रोफेशनल कामाबद्दल जास्त चर्चा करत नाही. पण त्याने माझ्या मालिकेचा प्रोमो पाहिला आणि त्याला तो आवडला. मी माझ्या करिअरमध्ये अशाप्रकारची एक वेगळी भूमिका स्वीकारली, याचाही त्याला आनंद आहे", असे सुरुचीने सांगितले.
लग्नानंतर आयुष्यात काय बदल झाला?
लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलाबद्दल बोलताना सुरुची म्हणाली, "हो अर्थात लग्नानंतर माझं आयुष्य खूप बदललंय. आधी मी माझं शूट संपवायचे आणि थेट घरी जायचे. माझी आई इतर गोष्टींची काळजी घ्यायची. आता मला सगळ्या गोष्टी स्वतःला कराव्या लागतायत. लग्नानंतर माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. लग्नाआधी मी माझे शूटींग संपवायचे आणि थेट घरी जायचे. माझी आई माझ्या इतर गोष्टींची काळजी घ्यायची. पण आता मात्र मला स्वतःच्या सर्व गोष्टी स्वत:ला कराव्या लागतात. पण या सगळ्यात मला पियुषची खूप मदत होते. तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे."
"आम्ही आमच्या घरातील कामांची विभागणी केली आहे. मी घरातील सामानाची खरेदी करते आणि घरातील इतर सर्व कामे करते. त्यामुळे बराच फरक पडला आहे. अनेक बदलही झालेत. पण मी सध्या माझ्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ आहे. त्याबरोबरच मला लग्नानंतर लगेचच ही मालिका मिळाली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे", असे सुरुचीने म्हटले.
दरम्यान सध्या सुरुची झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती खलनायिकेचे पात्र साकारत असून तिची भूमिका विरोचकाच्या सेवकाशी संबंधित आहे. यात ती ग्लॅमरस भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे यांच्या मुख्य भूमिका आहेत.