JNU हिंसाचाराविरोधात कलाकार एकवटले
मराठी कलाकारांचाही पाठिंबा
मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटत आहेत. आंदोलनाला बॉलिवूड कलाकारांनी अगदी सुरूवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. आता यामध्ये अनेक कलाकारांची उपस्थिती लागत आहे. अगदी मराठी सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आपल्याला माहितीच आहे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी भाजप सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून एक वॉरच सुरू केलं आहे.
तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील जेएनयूमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटली. यावेळी कोणतेही भाष्य न करता फक्त आंदोलन करणाऱ्या जेएनयूच्या विद्यार्थ्यांना तिने सपोर्ट केला आहे.
यासोबतच 'छपाक' सिनेमातील अभिनेता विक्रांत मेस्सीने देखील ट्विट केलं आहे. यामध्ये त्याने दीपिकाचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर काहींनी दीपिकाला पाठिंबा दिला असून काहींनी हा सिनेमाचा प्रमोशन फंडा असल्याचं म्हटलं आहे.
तसेच संगीतकार आणि अभिनेता स्वानंद किरकिरे यांनीदेखील विद्यार्थ्यांमध्ये सहभाग घेतला. मुंबईच्या कार्टर रोड, वांद्रे येथील स्वानंद किरकिरे यांनी 'बावरा मन' हे गाणं गाऊन विद्यार्थ्यांना सपोर्ट केला.
तसेच अभिनेता किशोर कदम जे सौमित्र नावाने कविता सादर करतात. त्यांनीदेखील आझाद मैदानात कविता सादर केली. "जाणवत नाही बुरखे धारी....आता त्या सगळ्यांना ओळखायला हवं " या मथळ्याखाली कविता सादर केली आहे.