Marathi and South Industry Collaboration : काही महिन्यांपूर्वी 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या मराठी सिनेमाच्या पोस्टरनं चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. या चित्रपटाचा लूक पाहून मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता की हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? विशेष म्हणजे, मराठी आणि कन्नडा चित्रपटांचं कोलॅबरेशन म्हणजे 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' हा चित्रपट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल आणि रमेश कोठारी निर्मित 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात दाखवलेल्या सीन्सनी, कलाकारांच्या अभिनयाच्या झलकनी, थरारक ऍक्शन सिक्वेन्सेसनं आणि प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. हा चित्रपट काहीतरी वेगळा आणि अधिक रोमांचक दिसतोय. मराठी चित्रपटसृष्टीनं आजवर विविध विषय सखोल विचार करून हाताळले आहेत. मात्र, हा चित्रपट एका नव्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या शैलीतून सादर करण्यात आलेला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे हे विविध जॉनरमधील चित्रपटाची निर्मिती करत प्रेक्षकांना खास अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा नेहमीच असा उद्देश असतो की प्रेक्षकांनी अडीच ते तीन तास सिनेमागृहात येऊन स्वतः साठी वेळ काढावा, रिलॅक्स व्हावे आणि मनोरंजनाचा आनंद घ्यावा. त्यामुळे त्यांनी नेहमीच अशा चित्रपटांची निवड केली आहे, जे प्रेक्षकांना आवडतील. आता त्यांनी एक नवं पाऊल पुढे टाकत एक नवीन विषय हाताळला आहे. या वेळी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक असा चित्रपट तयार केला आहे, जो कन्नडा सिनेमासोबत कोलॅबोरेट करून बनवला आहे. हा चित्रपट कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या 6 भाषांमध्ये पॅन इंडिया रिलीज होणार आहे.


हेही वाचा : 'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये', काजोलनं नीसा आणि युगचा फोटो शेअर करत दिला सल्ला


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटात मराठीतील लोकप्रिय कलाकार शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर, साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवीश शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार एकाच चित्रपटात एकत्र येऊन ज्या ताकदीनं हे पात्र साकारणार आहेत, ते प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना ठरणार आहे.