Naach Ga Ghuma Shooting Complete : 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'चि. व चि.सौ.का', 'वाळवी', 'एलिझाबेथ एकादशी', 'आत्मपॅफ्लेट' या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. मराठी मनोरंजनसृष्टीत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी परेश मोकाशी यांनी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली. आता नुकतंच या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर निर्माते-दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ‘नाच गं घुमा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे शूटींग 15 जानेवारीला सुरु झाले होते. आता नुकतंच अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत 'नाच गं घुमा' या चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे. यात अभिनेत्री नम्रता संभेराव, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, मायरा वायकुळ या अभिनेत्री दिसत आहेत. त्याबरोबरच या चित्रपटाचे व्हिडीओग्राफर, फोटोग्राफर आणि काही तंत्रज्ञ मंडळीही दिसत आहे. त्यासोबतच दिग्दर्शक परेश मोकाशी हेही या व्हिडीओत दिसत आहेत. 


सेटवरील पहिला व्हिडीओ समोर


"तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि शुभेच्छांमुळे 'नाच गं घुमा' चित्रपटाचे शूटींग पूर्ण झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया", असे मधुगंधा कुलकर्णी या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना मुक्तानेही शूटींग पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. "..आणि चित्रीकरण संपन्न. ‘नाच गं घुमा, चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण. आता चित्रिकरणोत्तर प्रक्रिया आणि मग.. 1 मे २०२४, महाराष्ट्र दिन या दिवसा पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित ‘नाच गं घुमा’", असे मुक्ता बर्वे म्हणाली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)


 दरम्यान ‘नाच गं घुमा’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत. तर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत नवऱ्यासह ‘नाच गं घुमा’च्या निमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘नाच गं घुमा’ची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे. हा बहुचर्चित चित्रपट 1 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.