`बबन`ने केली 3 दिवसात सव्वा तीन कोटींंची कमाई
`ख्वाडा` या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हे आता `बबन` हा चित्रपट आले आहेत.
मुंबई : 'ख्वाडा' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हे आता 'बबन' हा चित्रपट आले आहेत. 23 मार्च रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अल्पावधीतच बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी आणि बक्कळ कमाई केली आहे.
तीन दिवसात सव्वातीन कोटी
'बबन' चित्रपटाला प्रेक्षकांची दाद मिळत असल्याने चित्रपटाच्या शोच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. 'बबन'चे शो 200 वरून 240 करण्यात आले आहेत. अनेक सिनेमागृहांच्या बाहेर 'बबन' चित्रपटासाठी 'हाऊसफुल्ल'ची पाटी झळकत आहे.
नवे आणि उमदे कलाकार
'बबन' या चित्रपटातून एका महत्वाकांक्षी उद्योजक तरुणाची प्रेमकथा रंगवली आहे. या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन असे दुहेरी आव्हान भाऊराव कऱ्हाडे यांनी पेलले आहे.
फुल ऑन एंटरटेनमेंट' प्रस्तुत आणि 'चित्राक्षने निर्मिती केली आहे. 'ख्वाडा' फेम भाऊसाहेब शिंदे आणि या चित्रपटामधून पदार्पण करणारी 'फ्रेश लूक'ची अभिनेत्री गायत्री जाधव यांच्यासह शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, सीमा समर्थ, कृतिका तुळसकर, मृणाल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. ‘ते’ १०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन'सिनेमाचे निर्माते