मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, किंबहुना त्यांच्या मनात प्रश्चांचा काहूर माजवणारी मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २' (Ratris Khel Chale 2). मालिकेच्या पहिल्या भागाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्याचप्रमाणे मालिकेच्या दुसऱ्या भागाला देखील प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. मराठी भाषेत प्रसारित होणारी ही मालिका आता हिंदीमध्ये देखील डब करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर 'रात का है सारा' असं या हिंदी मालिकेचे नाव असणार आहे. 'रात का है खेल सारा' (Rat Ka hain Khel sara)  ही मालिका २९ फेब्रुवारीपासून ऍन्ड टीव्ही वाहिनीवर प्रसारित होणार आहे. मराठी मालिकेला ज्याप्रमाणे चाहत्यांचा मिळाला तसाच हिंदी मालिकेला रसिक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक असणार आहे. 


नाईकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम, विश्वासराव अशा अनेक मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यामुळे हिंदीमधील मालिका पाहण्यासाठी चाहते आतुर असल्याचे दिसत आहे. मलिकेत कोणताही प्रसिद्ध कलाकार नसताही पहिल्या आणि दुसऱ्या पर्वानेही प्रेक्षकांवर चांगलीच पकड मिळवली आहे.


या मालिकेतील लोकप्रिय पात्र म्हणजे शेवंता. शेवंताने फक्त मोठ्यांचीच नाही तर लहानांची देखील मने जिंकली आहेत. या शेवतांने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच मन जिंकल्यानंतर आता रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) 'इब्लिस' या मराठी नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली होती.