Baipan Bhari Deva : गेल्यावर्षी असंख्य मराठी चित्रपटातील सर्वाधिक सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणून 'बाईपण भारी देवा'कडे पाहिले जाते. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटाचे सर्वच शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रींच्या लूकचे प्रचंड कौतुक झाले. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 7 महिने पूर्ण झाले आहेत. आता या चित्रपटाची वेशभूषाकार असलेल्या युगेशा ओंकारने एक किस्सा सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युगेशा ओंकारने 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील अभिनेत्रींचे लूक डिझाईन केले होते. यानिमित्ताने नुकतंच तिने 'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या शूटींगदरम्यान ऐनवेळी कसा गोंधळ झाला होता आणि त्यानंतर तिला अभिनेत्रींनी कसं सांभाळून घेतलं, याबद्दल एक किस्सा सांगितला आहे. 


पहिल्या फेरीला ब्लाऊजचा झाला गोंधळ


यावेळी ती म्हणाली, "बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या पहिल्या फेरीला ब्लाऊजचा फार गोंधळ झाला होता. या चित्रपटाचे काम हे कायमच शेवटच्या क्षणी होत असतं. मी या फेरीसाठी विशिष्ट ब्लाऊज डिझाईन केले होते. ते मला त्या दिवशी मिळणार होते. पण तेव्हाच मला माझ्या टेलरचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की गेल्या दोन दिवसांपासून डोंबिवलीत वीज नाही. त्यामुळे ते ब्लाऊज शिवून झालेले नाहीत. त्यावेळी संध्याकाळचे सहा वाजले होते." 


अशाप्रकारे अभिनेत्रींनी केला सपोर्ट


"मला त्यावेळी काय करावं काहीच सुचत नव्हतं. त्यानंतर मग मी या चित्रपटातील अभिनेत्रींना फोन केला. त्यावेळी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे खणाचे ब्लाऊज असतील का? त्यातील काही जणींकडे होते. काही जणींकडे नव्हते. त्यावेळी मला रोहिणी मावशी म्हणाली, माझ्याकडे खणाचा ब्लाऊज नाही. पण मी कोणाचा घेता येतो का ते पाहते. त्या सर्वजणी मला तू काळजी करु नकोस, आम्ही पाहतो असं मला सांगत होत्या. मी तेव्हा त्यांना म्हटलं की 90 टक्के मी तुम्हाला ते ब्लाऊज देण्याचा प्रयत्न करते. पण त्या सर्वजणींनी मला आम्ही तीन चार ब्लाऊजचे पर्याय घेऊन येतो", असा किस्सा तिने यावेळी सांगितला. 



'बाईपण भारी देवा' या चित्रपटात वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, रोहिणी हट्टंगडी, दीपा परब, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकल्या. या चित्रपटाच्या कथेचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले होते. तर याची निर्मिती माधुरी भोसले यांनी केली होती.