Marital Dispute: ओडिशातील कटक येथे सब-डिवीजन ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टानं सत्ताधारी बीजू जनता दलाच्या खासदारापासून विभक्त झालेल्या पत्नीला घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. खासदारानं पत्नीला दरमहा 30 हजार रुपये देण्याचाही आदेश दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नी शरीरसंबंधांसाठी परवानगी देत नसल्यामुळं आपल्याला तिच्यासोबत राहायचं नाही, असं म्हणत या खासदारानं न्यायालयात याचिका दाखल केली. 


सूत्रांच्या महितीनुसार खासदार अनुभव मोहंती (Anubhav Mohanty) यांच्यापासून विभक्त झालेली पत्नी, अभिनेत्री वर्षा प्रियदर्शनी हिला नंदी शाही परिसरात असणारं मोहंती यांच घर सोडण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 


वर्षा यांना मोहंती यांनी प्रत्येक महिन्याला 30 हजार रुपये इतकी रक्कम द्यावी, जेणेकरुन त्या शहरात दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास राहू शकतील अशीही तरतूद न्यायालआनं केली आहे. (Marital Dispute actress wife of the mp vacate the house of the in laws)


2016 मध्ये पहिल्यांदाच मोहंती यांनी पत्निविरोधातील याचिका न्यायालयात दाखल केली होती. लग्नाला 2 वर्षे होऊनही पत्नी प्रियदर्शनी शारीरिक संबंध किंवा सर्वसामान्य दाम्पत्य जीवनाला परवानगी देत नाही, असं त्यांनी या याचिकेत म्हटलं होतं. 


अनेक प्रयत्नांनंतरही आपल्याला पत्नीशी शारीरिक संबंध ठेवताच आले नसल्याचं म्हणत आपली निराशा झाल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं होतं. 



2014 मध्ये झालेलं लग्न 
2014 मध्ये मोहंती आणि प्रियदर्शनीचं लग्न झालं होतं. आता मात्र हे दोघंही त्यांच्या नात्याची लढाई आपआपल्या परिनं लढताना दिसत आहेत. आतापर्यंत ती त्यांच्या घरात राहत होती. पण, आता मात्र या प्रकरणाला न्यायालयानं वेगळं वळण दिलं आहे.