मुंबई : अक्षय कुमार सध्या त्याच्या बेल बॉटम या चित्रपटामध्ये खूप व्यस्त आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर, अलीकडेच बेल बॉटमचं पहिलं गाणं मरजावां रिलीज झालं आहे. या गाण्यात अक्षयसोबत वाणी कपूर आहे आणि दोघांच्या केमिस्ट्रीलाही खूप पसंती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयने गाणं शेअर करत त्याचं आवडतं गाणं म्हटलं आहे. यासोबत त्यांनी लिहिलं आहे की, "बेल बॉटममधील माझं आवडतं गाणं. या गाण्याचे मेलोडी आणि लिरिक्स एकदम सॉफ्ट आहेत आणि कानांना दिलासा देतात. याचा अर्थ हे गाणं खूप छान आहे.


हे गाणं हिट झाल्यानंतर आता अक्षयने त्याच्या शूटिंग दरम्यानचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान, एक सीन येतो जेव्हा अक्षय आणि वाणी झोपाळ्यावर पडलेले असतात आणि मग अचानक दोघं खाली पडतात. चित्रपटाच्या टीमलाही आधी काही समजत नाही आणि मग प्रत्येकजण दोघांना भेटायला येतो आणि कुणाला दुखापत झाली आहे का हे तपासतात. हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे आणि चाहते त्यावर खूप कमेंट करत आहेत.


अक्षयचे पात्र काय आहे
चित्रपटात अक्षय रॉ एजंटची भूमिका साकारत आहे आणि वाणी कपूर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बोलताना, अक्षय प्लेन हायजेक झाल्यानंतर 210 होस्टेसना वाचवण्यासाठी जातो. अक्षय कुमार आणि वाणी कपूर व्यतिरिक्त लारा दत्ता आणि हुमा कुरेशी देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रणजीत तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट 19 ऑगस्टला थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसं, यापूर्वी बेल बॉटम एप्रिलमध्ये रिलीज होणार होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


कोविडनंतर अक्षयचा पहिला चित्रपट
कोविडनंतर अक्षय कुमारचा हा पहिला चित्रपट आहे जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी अक्षयचा लक्ष्मी चित्रपट कोविड दरम्यान प्रदर्शित झाला होता. जरी तो डिस्ने हॉटस्टार व्हीआयपी मध्ये रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. अक्षयकच्या यादीत अनेक चित्रपट आता रिलीजसाठी आहेत. बेल बॉटम व्यतिरिक्त, तो सूर्यवंशी, अतरंगी रे, राम सेतू, रक्षाबंधन, बच्चन पांडे आणि पृथ्वीराज मध्ये दिसणार आहे.