मुंबई : काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या 'भारत' या सिनेमात अपोझिट रोलमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नावाची चर्चा होती. मात्र हल्लीच प्रियंकाने हा सिनेमा करण्यास नकार दिला असल्याचं सांगितलं आहे. याची माहिती स्वतः दिग्दर्शक अली अब्बास जफरने ट्विट करून दिली आहे. अली अब्बास जफरच्या या ट्विटमधून हे स्पष्ट होतंय की, प्रियंका चोप्रा लवकरच तिचा बॉयफ्रेंड निकसोबत लग्न करत आहे. मात्र प्रियंकाने हा सिनेमा सोडल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.


वडिलांच्या निधनानंतरही सुरू राहिली शुटिंग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका प्रोड्यसुरने लग्नासाठी प्रियंका चोप्रा 'भारत' सिनेमा नाकारत असल्याच्या चर्चांना खोटं असल्याचं ठरवत आहे. त्यांच म्हणणं आहे की, प्रियंका चोप्रा भरून प्रोफेशनल आहे. 2013 मध्ये जेव्हा प्रियंका चोप्राच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा ती एका सिनेमात काम करत होती. मात्र तेव्हा वडिलांच्या अगदी जवळची असूनही प्रियंका कामासाठी तयार झाली होती. 


हे आहे खरं कारण 


सिनेमात दुसरे कलाकार जोडले गेल्यामुळे प्रियंका नाराज. जेव्हा प्रियंकाने हा सिनेमा साईन केला तेव्हा सलमान आणि तिच्या व्यतिरिक्त इतर कुणीही कलाकार नव्हते. मात्र दिशा पटानी आणि नोरा फतेही जोडल्यामुळे प्रियंका नाराज झाल्याचं सांगितलं आहे.