मुंबई : 'Violence, Violence, Violence...I Don’t Like It. I Avoid! But...Violence Likes Me, I Can’t Avoid!'याचा अर्थ 'हिंसा...हिंसा..हिंसा.. मला आवडत नाही. मी दुर्लक्ष करतो! पण... हिंसेला मी आवडतो आणि मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही'. सुपरस्टार यशचा नुकताच प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF 2' चा हा डायलॉग आहे, जो सध्या खूपच चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही 'KGF 2' पाहिला असेल तर तुम्हाला या डायलॉगचा स्वॅग नक्कीच समजला असेल आणि जर तुम्ही पाहिला नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यश म्हणजेच रॉकी भाई जेव्हा अधीरासमोर उभा राहतो आणि गोळ्या झाडतो तेव्हा हा डायलॉग बोलतो. आता तुम्ही विचार करत असाल की संपूर्ण चित्रपटाच्या यशामध्ये आपण फक्त संवादांवरच का बोलत आहोत? कारण यामागे एक कारण आहे. त्याचं कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


खरंतर, आता सोशल मीडियावर एक लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. असं म्हटलं जात आहे की 'KGF 2' च्या चाहत्याने त्याच्या लग्नासाठी हे कार्ड छापलं आहे. जरी आम्ही यावर दावा करत नाही. पण सोशल मीडियावर या कार्डची जोरदार चर्चा होत असून चर्चेचे कारण म्हणजे त्यावर लिहिलेलं एक खास कॅप्शन आहे, जे वाचून लोकांना हसू आवरता येत नाही आहे.



या लग्नपत्रिकेवर वधू-वरांचं नाव लिहिलेलं आहे. लग्नाची वेळ-ठिकाण लिहिलेलं असतं.  यासोबतच 'KGF 2' च्या डायलॉगच्या स्टाईलमध्ये एक कॅप्शन लिहिलं आहे जे खूपच मजेदार आहे. कार्डवर लिहिलं आहे की, 'लग्न... लग्न...विवाह. मला ते आवडत नाही, मी ते टाळतो, पण माझ्या नातेवाईकांनी ठरवलेलं लग्न मी टाळू शकत नाही.' म्हणजे 'लग्नावर मला दुर्लक्ष करणं आवडत नाही, परंतु माझ्या नातेवाईकांना लग्न आवडतं. मी दुर्लक्ष करू शकत नाही. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.