मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर एक्टीव्ह असते. सारा नेहमीच आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. साराचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोवर आहे. दरम्यान सध्या साराला कोणाचीतरी कमी जाणवतेय. ती कोणाला तरी मिस करतेय. साराने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्वत:चा फोटो शेअर करत ती नक्की कोणाला मिस करतेय, हे तिने सांगितलं आहे.  (master blaster sachin tendulkar daughter sara tendulkar missing one thing) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साराला कोणाची कमी जाणवतेय? 


साराने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्वत:चा फोटो शेअर केला आहे. साराने लांबसडक केस असलेला हा फोटो शेअर केला आहे. "मला माझ्या लांबसडक आणि काळेभोर केसाची कमी जाणवतेय", अशी कॅप्शन साराने या फोटो स्टोरीला दिली आहे. साराला तिचा जुना लूक आठवतोय. मात्र तिला एका जाहिरातीसाठी तिचे केस कापावे लागले. 


मॉडेलिंगसाठी कापले केस


साराने काही दिवसांपूर्वी मॉडेलिंगचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोत साराने तिचे कापलेले दिसून येत आहेत. तिला कापलेल्या केसाबाबत काहीशी खंत जाणवतेय. साराने काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं होतं.